Ebayवर पाकिस्तानी गोलंदाज विक्रीला, पाहा काय आहे प्रकरण...

 पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज याला ई कॉमर्स साईट Ebayवर खरेदी करू शकतात. त्याच्या एका समर्थकाने या साइटवर रियाज याला विकण्याची जाहिरात दिली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2017, 06:07 PM IST
 Ebayवर पाकिस्तानी गोलंदाज विक्रीला, पाहा काय आहे प्रकरण... title=

नवी दिल्ली :  पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज याला ई कॉमर्स साईट Ebayवर खरेदी करू शकतात. त्याच्या एका समर्थकाने या साइटवर रियाज याला विकण्याची जाहिरात दिली आहे. 

त्याला खरेदी करण्यासाठी त्याच्या समर्थकांनी बोली लावली आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक बोली रियाजला खरेदी करण्यासाठी लागली आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून पाकिस्तानने सामना गमावलेल्यानंतर संतापलेल्या चाहत्याने रियाजला विक्रीला काढला आहे. आतापर्यंत रियाजवर ६१९ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे ३० हजार पुयांची बोली लागली आहे. 

लिलाव करणाऱ्याने वहाब याला सेकंड हँड म्हटले आहे. तसेच हा तोच यूज्ड वहाब आहे, ज्याला २००८ मध्ये खरेदी केले होते. असे डिस्क्रिब्शनमध्ये दिले आहे.  जेव्हा मी खरेदी केले तेव्हा आशा होती की पाकिस्तानला जिंकण्यासाठी मदत करेल, माझ्या आशांवर पाणी फेरले त्यामुळे त्याला विकत आहे.

विक्री करणारा अजून म्हटला की, तो गोलंदाजीच्या लायक आहे, पण कधीकधी लीक होतो.. याला खरेदी केल्यास एक जॅकेट फ्री मिळणार आहे. मी वहाबचे अपग्रेड मॉडेल जुनैद खानला खरेदी केले आहे. त्यामुळे वहाबला विकत आहे.