PAK vs SA : पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील 'गेम ओव्हर', रोमांचक सामन्यात 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने रचला इतिहास!

Pakistan vs South Africa : 24 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने इतिहास देखील रचला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 271 धावांचं आव्हान पूर्ण करताना एडम मार्करम याने 91 धावांची खेळी केली.

Updated: Oct 27, 2023, 10:51 PM IST
PAK vs SA : पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील 'गेम ओव्हर', रोमांचक सामन्यात 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने रचला इतिहास! title=
PAK vs SA

World Cup 2023 Semi Final Scenario : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर करो या मरो या सामन्यात पाकिस्तानला सलग चौथ्यांदा पराभवाची धुळ चाखावी लागली आहे. रोमांचक सामन्यात साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील पत्ता कट केलाय. 24 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने इतिहास देखील रचला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 271 धावांचं आव्हान पूर्ण करताना एडम मार्करम याने 91 धावांची खेळी केली. तर पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आणि सौद शकील या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकाकडून तरबेज शम्सी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानने दिलेल्या 271 धावांचं आव्हान पूर्ण करताना साऊथ अफ्रिकेला अपेक्षेप्रमाणे सुरूवा करता आली नाही. दोन्ही सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा अनुक्रमे 24 आणि 28 धावा करत बाद झाले. तर क्लासेन आणि डुसेन देखील बाद झाले. मात्र, एडम मार्करम याने एक बाजू लावून धरली होती. त्याने 91 धावांची खेळी केली. तर अखेरच्या खेळाडूंनी बारक्या बारक्या इनिंग खेळून डाव सावरला. साऊथ अफ्रिकेच्या दोन विकेट शिल्लक होत्या, तेव्हा पाकिस्तानने डाव पलटला. लुंगी एन्गडी 4 धावा करून बाद झाल्यानंतर पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी एका विकेटची गरज होती. मात्र, केशव महाराजने एक फोर मारत पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील पत्ता कट केला आहे.

आणखी वाचा - SA vs PAK : रिझवानने शिवीगाळ करत जान्सनविरुद्ध खेळला रडीचा डाव? पाहा LIVE सामन्यात नेमकं काय झालं?

प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकाने पाकिस्तानला 270 धावांवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानकडून फक्त दोघांनाच अर्धशतक करता आलं. सौद शकील याने 57 बॉलमध्ये 52 धावा केल्या. बाबर आझम याने 65 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर मोहम्मद रिझवान याने 31 आणि मोहम्मद नवाझ याने 24 धावा चोपल्या होत्या. अखेर पाकिस्तानच्या शेपटीने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आलं नाही. पाकिस्तानचा डाव 270 धावांवर गुंडाळला गेला. 

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जान्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.