PAK vs NZ Semi final T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणारा टी -20 वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंड खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव केला आणि फायनलमध्ये (T20 World Cup Final) एन्ट्री मारलीये. दरम्यान या सामन्यात केन विलियम्सनने (Kane Williamson) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. जेव्हा न्यूझीलंड फलंदाजीसाठी मैदानावर उतरली तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
न्यूझीलंड फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला फोर बसली आणि त्यानंतर टाकलेल्या 2 बॉल्सवर मोठा ड्रामा झाला. यामध्ये न्यूझीलंडचा एकच फलंदाज दोन बॉल्सवर आऊट झाला. यावेळी एकदा त्याला जीवनदान मिळालं तर दुसऱ्यावेळी त्याला पव्हेलियनमध्ये पुन्हा परतावं लागलं.
पाकिस्तानसाठी पहिल्या ओव्हरची सुरुवात शाहीन शाह आफरीदीने केली. यावेळी स्ट्राईकला फिन ऐलन खेळत होता. त्याने शाहीनच्या पहिल्या बॉलवर मिड-ऑनवर स्ट्रेट फोर मारली. यानंतर पुढच्याच बॉलला शाहीनने कमबॅक करत टाकलेला बॉल ऐलनच्या पॅडवर लागला. यावेळी अंपायने LBW आऊट दिलं, तर ऐलने तातडीने DRS घेतला. त्यावेळी बॉल बॅटवर लागून पॅडलला लागल्याचं दिसलं. यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळालं.
तिसरा बॉलही ऐलनच्या पॅडवर लागला आणि अंपायरने पुन्हा आऊट करार दिला. यावेळी पुन्हा एकदा ऐलनने DRS घेतला आणि त्याला जीवनदान मिळालं नाही. थर्ड अंपायरने सर्व गोष्टी तपासून फलंदाजाला आऊट करार दिला. यानंतर बाकी ओव्हर कर्णधार केन विलियम्सनने खेळली.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला 153 रन्सचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तानने फलंदाजीला चांगली सुरुवात केली. ओपनर बाबर आणि रिझवान यांना उत्तम खेळी करत अर्धशतकं ठोकली. 53 रन्सवर बाबर माघारी परतल्यावरही रिझवावने त्याचा खेळ सुरु ठेवला. मोहम्मद हॅरिसनेही त्याला 30 रन्सची साथ देत विजय खेचून आणला. अखेर 3 विकेट्स गमावत पाकिस्तानने 19.1 ओव्हरमध्ये 153 रन्सचं लक्ष्य पूर्ण करत न्यूझीलंडचा पराभव केला.