PAK vs ENG: गुडघ्यावर बसून मारायला गेला अन् हातातली बॅटच सटकली...अंपायर थोडक्यात वाचला; पाहा Video

PAK vs ENG 3rd Test: बॅट साधीसुधी नाही तर 10 फूट लांब जाऊन (Ben Stokes Bat Slipped) पडली. बॅट हवेत असेपर्यंत सर्वांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. लेग साईडला उभ्या असलेल्या अंपायरच्या...

Updated: Dec 20, 2022, 11:21 PM IST
PAK vs ENG: गुडघ्यावर बसून मारायला गेला अन् हातातली बॅटच सटकली...अंपायर थोडक्यात वाचला; पाहा Video title=
PAK vs ENG,Ben Stokes

Ben Stokes Bat Slipped Video: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. अखेरचा सामना जिंकताच इंग्लंडने यजमान पाकिस्तानला वाईटवॉश (whitewash) दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच सामन्यातील कॅप्टन बेन स्टोक्सचा (Ben Stokes) व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. (pak vs eng watch funny video of ben stokes bat slipped and flows  in the air on six missed attempt marathi news)

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात स्टोक्सने (Ben Stokes) दमदार फलंदाजी केली, जो रूटच्या (Joe Root) आधी मैदानात उतरला आणि सामना लवकरात लवकर संपवला. इंग्लंडच्या डाव सुरू असताना बाबरने नौमान अलीला (Nauman Ali) 15 वी ओव्हर दिली. स्टोक्सने त्याच्या चेंडूवर शॉट मारण्यासाठी खाली वाकून बॅट जोरात फिरवली पण चेंडू बॅटला टच करण्यापूर्वी बॅट हवेत उडी मारून दूरवर पडली. 

आणखी वाचा - PAK vs ENG: कॅप्टन बाबर आझमने रचला इतिहास; रिकी पाँटिंगच्या 'या' बड्या रेकॉर्डची बरोबरी!

बॅट साधीसुधी नाही तर 10 फूट लांब जाऊन (Ben Stokes Bat Slipped) पडली. बॅट हवेत असेपर्यंत सर्वांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. लेग साईडला उभ्या असलेल्या अंपायरच्या जवळ जाऊन बॅट पडली. त्यामुळे अंपायर देखील थोडक्यात बचावला.

पाहा Video -

दरम्यान, इंग्लंडने तिन्ही सामन्यात (PAK vs ENG) पाकिस्तानला लोळवल्यानं आता पाकिस्तान संघाच तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. येत्या 26 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे आता आगामी मालिकेत पाकिस्तान कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.