पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) इंग्लंडने नाव कोरले आहे. बेन स्टोक्सच्या झंझावती कामगिरीच्या बळावर इंग्लंडने (England) पाकिस्तानचा (Pakistan) 5 विकेटस राखून पराभव केला आहे. हा विजय मिळवून इंग्लंडने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले आहे. सामन्यादरम्यान वर्ल्ड कपवर पाकिस्तान नाव कोरणार असे अनेकांना वाटत होते. त्याप्रमाणे सामना देखील सुरु होता, मात्र मैदानातला तो क्षण पाकिस्तानचा पराभव करून गेला. हा क्षण कोणता होता, हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानची (Pakistan) 16 वी ओव्हर या सामन्यातली टर्निंग पॉईंट ठरली होती. या 16 व्या ओव्हर पुर्वी पाकिस्तान हा सामना जिंकेल असे प्रत्येक चाहत्यांना वाटत होते. त्याप्रमाणे पाकिस्तान भेदक गोलंदाजी देखील करत होती. आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी धडकी भरत होती. मात्र 16 व्या ओव्हरमध्ये एक अशी घटना घडली. या घटनेनंतर पाकिस्तान पराभवाच्या छायेत गेली होती.
हे ही वाचा : इंग्लंडच्या विजया मागचा 'रियल हिरो'! अवघ्या 7 महिन्यात करून दाखवला करिश्मा
16 व्या ओव्हरपुर्वी इंग्लंडने (England) 4 विकेट गमावून 97 धावा केल्या होत्या. इंग्लंड (England) चांगल्याच दबावात होती. हा दबाव आणखीण वाढवण्यासाठी पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) ओव्हर टाकायला आला होता. त्याने ओव्हरचा पहिला बॉल टाकताच तो जखमी झाला. या दुखापतीमुळे त्याला धाव घेण्यास त्रास होत होता आणि त्याने अचानक मैदान सोडले होते. पाकिस्तानसाठी ही ओव्हर खूप महत्वाची होती. आणि या महत्वाच्या ओव्हरमध्येच तो दुखापत ग्रस्त झाला होता. आणि इथूनच पाकिस्तानच्या पराभवाला सुरूवात झाली होती.
शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) निव्वळ 3 ओव्हर टाकल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्याने 13 रन्स देऊन 1विकेट काढली होती. तर तिसऱ्या ओव्हरचा त्याला फक्त 1 बॉल टाकता आला होता आणि तो दुखापतग्रस्त झाला होता. इतर 5 बॉल दुसऱ्या खेळाडूला टाकावे लागले. दरम्यान अस पाहायला गेलं तर तो 1 बॉल सोडला तर आफ्रिदीकडे (Shaheen Afridi) 2 ओव्हर होत्या. या 2 ओव्हर डेथ ओव्हरमधल्या होत्या. या ओव्हरमधून इंग्लंडवर चांगलाच दबाव टाकता आला असता. आणि कदाचित या वर्ल्ड कपचा निकाल वेगळा लागला असता. मात्र आफ्रिदीच्या दुखापतीमुळे ते शक्य झाल नाही.
पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या अस्त्राने मैदान सोडताच इंग्लंडने (England) सामन्यात पुनरागमन केले. आणि 5 विकेट राखून पाकिस्तानला (Pakistan) नमवून वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरलं.