मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo olympic 2020) भारताने 7 पदकं जिंकून आतावरची ऐतिहासिक कामिगरी केली. पदक जिंकणाऱ्या स्टार्स खेळाडूंपैकी एक म्हणजे (Ravi Dahiya) रवी दहिया. रवीने कुस्तीमध्ये भारताला रौप्य पदक (Silver Medel) मिळवून दिले. रवी एका हिंदी वृत्त वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने ऑलिम्पिकमधील प्रवासाबाबत सांगितलं. रवीला सामन्यादरम्यान कझाकिस्तानचा पैलवान नूरइस्लाम सानायेवने (Nurislam Sanayev) चावा घेतला होता. यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. याबाबतही रवीने खुलासा केला. (olympic 2020 silver medel winner ravi dahiya reaction on bitten by Nurislam Sanayev)
ऑलिम्पिकमधील सेमी फायनल सामन्यात पैलवान नूरइस्लामने रवी दहियाच्या दंडाला चावा घेतला. सामना जिंकण्यासाठी तसेच दहियाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी नूरइस्लामने हा गैरप्रकार केला. या सर्व प्रकारावरुन त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. पण जेव्हा याबाबत रवी दहियाला विचारण्यात आलं तेव्हा त्याने या सर्व प्रकरणाला खिलाडूवृत्तीशी जोडलं.
रवी दहिया काय म्हणाला?
"मी रेफरीला याबद्दल सांगितलं होतं, पण याचा विरोध करून काही उपयोग नाही. तोही त्याच्या देशासाठी खेळत होता आणि मी माझ्या देशासाठी खेळत होतो. सर्व काही खेळ आहे. यात काही मोठी गोष्ट नाही. तो माझा मित्र आहे. या सर्व प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी त्याने माझी माफीही मागितली. त्यामुळे या प्रकरणाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही", असं रवीने स्पष्ट केलं.