Ravi Shastri On ODI World Cup: आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपसाठी (2023 ODI World Cup) टीम इंडिया शड्डू ठोकून तयार असल्याचं पहायला मिळतंय. अशातच टीम इंडियाचा माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मोठं वक्तव्य केलंय. मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने (DK) देखील यावर सहमती दर्शविली आहे.
मी हे म्हणतोय कारण की, 1983 मध्ये जेव्हा आम्ही वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो 60 षटकांचा खेळ होता. मग लोकांचा कल कमी झाला, मग 50 ओव्हर खेळवली जाऊ लागली. मला वाटतं की आता 40 ओव्हरचा खेळ होण्याची वेळ आली आहे. काळाबरोबर गोष्टी विकसित होतात. क्रिकेटचं हे स्वरूप कमी करण्याची गरज आहे, असं मत रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri On ODI World Cup) व्यक्त करून दाखवलं आहे.
कसोटी क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. ती खरी गोष्ट आहे. माझ्या मते भारतात सर्व फॉरमॅटसाठी जागा आहे. जगभरात अनेक देशांतर्गत लीग आहेत ज्यामध्ये T20 खेळाला प्रोत्साहन दिलं जातं. आपण त्या लीग होऊ द्यायला हव्यात आणि त्यादरम्यान विश्वचषक व्हायला हवा, असं मत देखील रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.
यंदा बीसीसीआयनं (BCCI) या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलं आहे. तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं आहे. त्यामुळे यंदा टीम इंडिया घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.
रोहित शर्मा (C), ईशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.