Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर 118 धावांनी (nz vs ned) विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही जिंकली. 

Updated: Apr 2, 2022, 08:39 PM IST
Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक title=

मुंबई : न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर 118 धावांनी (nz vs ned) विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने या 3 मालिकेत आता 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) हा विजयाचा हिरो ठरला. टॉमने विशेष म्हणजे आपल्या वाढदिवशी मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. (nz vs ned 2nd odi new zealand captain tom latham scored 140 runs innings on his birthday and break sachin tendulkar record)

टॉम लॅथमची विक्रमी कामगिरी

टॉम आपल्या वाढदिवशी वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला. टॉमने या सामन्यात 123 बॉलमध्ये 10 फोर आणि 5 सिक्ससह नॉट आऊट 140 धावांची खेळी केली. टॉमने 30 व्या वाढदिवशी ही कामगिरी केली. टॉमने यासह बर्थडेला सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम केला. टॉमने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड ब्रेक केला. 

टॉमच्याआधी सचिनने आपल्या 25 व्या वाढदिवशी 1998 मध्ये  134 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने हा कारनामा केला होता. रॉसने 2011 मध्ये 131 रन्स केल्या होत्या.  याशिवाय सनथ जयसूर्या आणि विनोद कांबलीनेही वाढदिवशी शतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता.