मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सेक्टर ७१चा शिवम मावी आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
कोलकाताने तीन कोटी रुपयांना त्याला विकत घेतलेय. ऑलराऊंडरची भूमिका बजावणाऱ्या शिवमने वर्ल्डकप क्रिकेटमध्ये १४५ किमी प्रतितासच्या वेगाने गोलंदाजी केली होती. त्याने चार सामन्यांमध्ये ८ विकेट घेत भारतासाठी चांगली कामगिरी केली होती.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ट्विट करुन शिवमचे कौतुक केले होते. भारताचा ३०जानेवारीला पाकिस्तानविरुद्ध मुकाबला रंगणार आहे.
शिवमचे कुटुंब मेरठमधील आहे. त्याचा आई-वडिल नोकरीनिमित्त १४ वर्षापूर्वी नोएडाला आले होते. त्यावेळी त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. शिवम त्यावेळी मित्रांसोबत क्रिकेट खेळत असे. त्याचा खेळातील रस पाहून त्याच्या घरच्यांनीही त्याला पाठिंबा देण्यास सुरुवात केली.
२०१६मध्ये शिवमच्या पायानां फ्रॅक्चर झाले यामुळे एक वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्यानंतर त्याने अंडर १४मध्ये दिल्लीकडून त्याने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यान मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी जो उधार बॅट घेऊन खेळायचा त्याला कोलकाता नाईटर रायडरने तब्बव ३ कोटी रुपयांना खरेदी केले.