हा खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे नीता अंबानी दु:खी

आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे.

Updated: Jan 29, 2018, 04:50 PM IST
हा खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे नीता अंबानी दु:खी  title=

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे. या लिलावाआधी मुंबईनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला टीममध्ये कायम ठेवलं तर लिलावावेळी कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्याला राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा एकदा टीममध्ये घेण्यात आलं.

या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानींनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या खेळाडूला टीममध्ये विकत घेता आलं नसल्यामुळे मी नाराज नाही पण हरभजन सिंग आता मुंबईच्या टीममध्ये नसल्यामुळे मला दु:ख झाल्याचं नीता अंबानींनी द टेलीग्राफला सांगितलं आहे.

पहिल्या आयपीएलपासून हरभजन मुंबईसोबत

आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आयपीएलच्या इतिहासात हरभजन आणि कोहली हे दोनच खेळाडू सगळ्या आयपीएल एकाच टीमकडून खेळले होते. विराट कोहली अजूनही आरसीबीच्या टीममध्ये कायम आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना हरभजननं १३६ आयपीएल मॅचमध्ये १२७ विकेट घेतल्या. २६.६५ची सरासरी आणि ६.९६च्या स्ट्राईक रेटनं हरभजननं आयपीएलमध्ये बॉलिंग केली. आता हरभजनला चेन्नई सुपरकिंग्जनं विकत घेतलं आहे.

हरभजनची प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सकडून त्यांच्या पुढच्या योजनेबद्दल मला सांगण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्स मला कुटुंबासारखं आहे आणि त्यांचा निर्णय मला स्वीकारावाच लागणार आहे, असं हरभजन म्हणालाय.

मुंबई इंडियन्स जो निर्णय घेईल तो त्यांच्या टीमच्या चांगल्यासाठीच असेल. मी दु:खी नाही. ज्या टीमकडून मी खेळेन त्या टीमसाठी मी माझं १०० टक्के योगदान देईन, असा विश्वास हरभजननं व्यक्त केला आहे. 

आता अशी असेल मुंबई इंडियन्सची टीम

रोहित शर्मा- १५ कोटी रुपये

हार्दिक पांड्या- ११ कोटी रुपये

जसप्रीत बुमराह- ७ कोटी रुपये

कायरन पोलार्ड- ५.४ कोटी रुपये

मुस्तफिजूर रहमान- २.२ कोटी रुपये

पॅट कमिन्स- ५.४ कोटी रुपये

सुर्यकुमार यादव- ३.२ कोटी रुपये

कृणाल पांड्या- ८.८ कोटी रुपये

इशान किशन- ६.२ कोटी रुपये

राहुल चहर- १.९ कोटी रुपये

एव्हिन लुईस- ३.८ कोटी रुपये

सौरभ तिवारी- ८० लाख रुपये

बेन कटिंग- २.२ कोटी रुपये

प्रदीप सांगवान- १.५ कोटी रुपये

जेपी डुमिनी- १ कोटी रुपये

जेसन बेहरेनडोफ- १.५ कोटी रुपये

तेजींदर धिल्लोन- ५५ लाख रुपये

शरद लुम्बा- २० लाख रुपये

सिद्धेश लाड- २० लाख रुपये

आदित्य तरे- २० लाख रुपये

मयांक मारकंडे- २० लाख रुपये

अकिला धनंजय- ५० लाख रुपये

अनुकूल रॉय- २० लाख रुपये

एमडी निधीश- २० लाख रुपये