Pakistan Cricket Board New Chairman : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. रमीझ रजा (Ramiz Raja) यांच्या जागी नजम सेठी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेमध्ये (ENGvsPAK Test Series) पाकिस्तान संघाला इंग्लंडने 3-0 व्हॉईटवॉश दिला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांनीही नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
पीसीबीच्या घटनेनुसार पंतप्रधान क्रिकेट पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, 'बोर्ड ऑफ गव्हर्नर्स' त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीझ राजा यांना 2021 मध्ये अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.
रमीज रझा यांनी पीसीबी आणि बीसीसीआय वादावर अनेकवेळा वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता नियुक्त करण्यात नजम सेठी यांनी यांनी 2013 आणि 2014 मध्ये पीसीबीचे अध्यक्षपदही भूषवले होते.
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी 2023 साली पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळण्यासाठी टीम इंडिया जाणार नसल्याचं म्हटलं होतं. यावर रमीज रजा यांनी पाकिस्तान वर्ल्ड कप खेळणार नाही, अशी धमकी दिली होती. यावरून रजा यांच्यावर बरीच टीकेच जोड उठली होती. त्यानंतर भारत-पाकची कसोटी क्रिकेटला गरज असल्याचं म्हणत रजा यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, रमीझ रजा यांनी अध्यक्षपद कायम ठेवण्यात यशस्वी ठरले होते. मात्र इंग्लंड संघाकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर अखेर त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे