New Zealand vs Bangladesh : चेन्नईच्या एस चिन्नास्वामी मैदानावर वर्ल्ड कपचा (World Cup) न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा उभारल्या. बांगलादेशच्या डावात विकेटकीपर मुशफिकर रहिम (Mushfiqur Rahim) याने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 246 धावांचं आव्हान मिळालं आहे. अशातच मुशफिकर रहिम याच्या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरूवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. लिटल दास (Litton Das) एकही धाव न करता बाद झाला. तर दुसरा सलामीवीर तनजीद हसन देखील 16 धावा करत बाद झाला. त्यानंतर नजमुल हुसेन शांतो आणि मेहदी हसन मिराज यांनी नांग्या टाकल्या. त्यानंतर कॅप्टन शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मुशफिकर रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुशफिकरने 66 धावांची खेळी केली. मात्र, 36 व्या सामन्यात मॅट हेन्रीने (Matt Henry) एका परफेक्ट बॉलवर मिशफिकरच्या दांड्या गुल केल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
दरम्यान, बांगलादेशला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची सुरूवात देखील चांगली झाली नाही. वर्ल्ड कपमधील शतकवीर रचिन रविंद्र लवकर बाद झाला. त्याला फक्त 9 धावा करता आल्या. त्यानंतर डिवॉन कॉवने अन् केन विलियम्सन याने सावध खेळी करण्यास सुरूवात केली आहे.
बांग्लादेश : तनजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (C), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (WK), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.