'एक नारळ दिलाय' वर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स प्लेयर्सना नाचवलं, नक्की पाहा

मराठी गाण्यावर डान्स

Updated: Apr 7, 2021, 11:08 AM IST
'एक नारळ दिलाय' वर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स प्लेयर्सना नाचवलं, नक्की पाहा  title=

मुंबई : पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) यंदाच्या सिझनमधील पहिला सामना 9 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबईची टीम यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी भिडणार आहे. IPL 2021 पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा जोरदार मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

मजबूत फलंदाजी आणि उत्कृष्ट 'पॉवर हिटर' म्हणून ओळखला जाणारा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीच आपलं मराठी प्रेम दाखवत असतो. तो अनेक अमराठी खेळाडुंकडून मराठी बोलून घेत असतो. यावेळी तो पांड्या ब्रदर्स, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत मराठी गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाणं सध्या सोशल मीडियात तूफान व्हायरल आहे. फेसबुक व्हिडीओ, इन्स्टाग्राम रिल्सवर तर सर्वजण याच गाण्यावर परफॉर्मन्स देतायत. त्याला लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतायत.
मुंबई इंडीयन्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे या मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत विजय मिळवून ट्रॉफी जिंकली होती. आयपीएल ट्रॉफी सर्वाधिक 5 वेळा  जिंकणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक सारख्या सलामीवीरांसह फलंदाजी ही मुंबईची मजबूत बाजू आहे.