ipl 2018 : धोनीला या ५ क्रिकेटर्सना घ्यायचेय संघात

चेन्नई सुपर किंग आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दमदार संघ राहिलाय. या संघाने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले. आयपीएलमधून दोन वर्षे निलंबित केल्यानंतर चेन्नई सुपर किंग पुनरागमनासाठी सज्ज झालीये.

Updated: Jan 19, 2018, 03:16 PM IST
ipl 2018 : धोनीला या ५ क्रिकेटर्सना घ्यायचेय संघात title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दमदार संघ राहिलाय. या संघाने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले. आयपीएलमधून दोन वर्षे निलंबित केल्यानंतर चेन्नई सुपर किंग पुनरागमनासाठी सज्ज झालीये.

चेन्नईने यंदाच्या मोसमासाठी एम एस धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना संघात कायम ठेवलेय. चेन्नईच्या जवळील सूत्रांच्या माहितीनुसार आयपीएल २०१८साठी धोनीच चेन्नईचा कर्णधार असणार आहे. दरम्यान सुरेश रैना आणि जडेजाव्यतिरिक्त आणखी असे ५ क्रिकेटर आहेत ज्यांना धोनी कोणत्याही किंमतीला खरेदी करण्यासाठी तयार होईल. 

आर. अश्विन - चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या आर. अश्विनने क्रिकेटमध्ये आपली ओळख चेन्नईमध्ये खाते खोलत केली होती. धोनी आणि अश्विनची जोडी आयपीएलमध्ये सुपरहिट ठरली होती. या दोघांमुळे अनेकदा चेन्नईला विजय मिळवला. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी धोनीचा आग्रह असेल.

गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडरने गौतम गंभीरला २०१८साठी संघात कायम ठेवले नाही. त्यामुळे तो या आयपीएलमधील लिलावाचा महत्त्वाचा हिस्सा असेल. गौतम गंभीरकडे असलेल्या अनुभवाची शिदोरी पाहता धोनी त्याला संघात घेण्यासाठी नक्कीतच प्रयत्न करेल. कारण आयपीएलमध्ये गंभीरची कामगिरी चांगली राहिलीये. 

बेन स्टोक्स - गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मॅन ऑफ दी टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणाऱ्या स्टोक्सवर सगळ्याच फ्रंचायजींची नजर असेल. यातच कर्णधार धोनीही त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न करेल. 

मनीष पांडे - चेन्नईची फलंदाजी नेहमीच मजबूत राहिलीये. याचे कारण म्हणजे या संघातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय संघात खेळतात. आयपीएल २०१८च्या लिलावात मनीष पांडेही असणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या फ्रंचायजींची नजर मनीष पांडेवर असेल.

तमीम इक्बाल - बांगलादेशचा स्टार सलामीवीर तमीम इक्बाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करतोय. त्यामुळे आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. त्याचा फॉर्म पाहता तमीम इकबालला संघात घेण्यासाठी नक्कीच धोनी प्रयत्नशील असेल.