कोट्यधीश असून सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 'नवकोट नारायण' क्रिकेटपटू

सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 7 क्रिकेटपटू. 

Updated: Sep 13, 2021, 07:52 PM IST
कोट्यधीश असून सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे  'नवकोट नारायण'  क्रिकेटपटू title=

मुंबई : टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे श्रीमंत आहेत. मैदानात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर खेळाडूंना जाहिरातीसाठी पंसती दिली जाते. हे क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त इतर माध्यमातूनही कमाई करतात. टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतात. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी आघाडीवर आहेत. या दोघांसह टीम इंडियाचे अन्य क्रिकेटपटू हे कोट्यधीश असूनही मैदानातील कामगिरी सांभाळत  सरकारी नोकरीही करतात. (ms dhoni harbhajan singh and 5 others indian cricketer who do government jobs see full list)

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना नाचवतो. चहलला कमी काळात प्रसिद्धी मिळाली. चहल क्रिकेटसोबत चेसमध्ये मास्टर आहे. चहलने चेसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत अनेकदा चॅम्पियन ठरलाय. चहल आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहे.  

उमेश यादव (Umesh Yadav)

वेगवान गोलंदाज उमेश यादव हा नागपूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. उमेशने अनेकदा टीम इंडियाला बॉलिंगच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. उमेश जरी आता क्रिकेटपटू असला, तरी त्याचं लहानपणापासून पोलीस होण्याचं स्वप्न होतं. मात्र ते शक्य झालं नाही. उमेश रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. उमेश 2017 पासून यशस्वीपणे ही जबाबदारी पार पाडतोय. 

कपिल देव  (Kapil Dev)

कपिल देव यांनी टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात भारताला पहिलावहिला वर्ल्ड कप मिळवून दिला. त्यांना या ऐतिहासिक कामगिरीसाठी 2008 मध्ये भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलं. याशिवाय देव हे  हरयाणा क्रीडा महाविद्यालयाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली होती.  

जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)

क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा यशस्वी होतोच असं नाही. किंवा जे खेळाडू यशस्वी होतात, त्यांना पुढे खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. मात्र तरीही ते क्रिकट चाहत्यांना नेहमीच लक्षात असतात. त्यापैकी एक म्हणजे जोगिंदर शर्मा. जोगिंदर शर्मा हे नाव माहिती नाही, असा क्रिकेट चाहता शोधून सापडणार नाही. टीम इंडियाने 2007 मध्ये पहिल्या वहिल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी ठरली होती. या अंतिम सामन्यात जोगिंदरने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र त्यानंतर जोगिंदर क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. जोगिंदर सध्या हरयाणा पोलीस विभागात डीएसपी पदावर आहे. 
 
हरभजन सिंह (Harbhajan Singh)

हरभजन सिंह टीम इंडियाच्या यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. भज्जीने कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय. भज्जीला क्रिकेटमधील योगदानासाठी त्याला पंजाब पोलीसा दलात डीएसपी पदी नेमणूक करण्यात आली आहे. 

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अर्थात क्रिकेटचा देव. सचिनने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत, जे निवृत्तीच्या अनेक वर्षानंतरही कायम आहेत. सचिनच्या असमान्य कामगिरीसाठी त्याला भारतीय वायू दलाकडून गौरवण्यात आलं. सोबतच सचिनला 2010 मध्ये वायू सेनेच्या ग्रृप कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

महेंद्रसिंह धोनी  (Mahendra Singh Dhoni)

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. धोनीचं हे स्वप्न भारतीय संघाला उंचीवर नेल्यानंतर  पूर्ण झाले. धोनीची भारतीय लष्करात 2015 मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती झाली. माही आपल्या फावल्या वेळात अनेकदा भारतीय लष्कराच्या तरुणांसोबत वेळ घालवतो.