मुंबई : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतासाठी अनेकवेला दमदार कामगिरी केली आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्येही आपलं नाणं चोख बजावलंय. गुजरात टायटन्सच्या विजयात मोहम्मद शमीचा सिंहाचा वाटा होता. दरम्यान शमीच्या पर्सनल लाईफमध्ये फार उतार-चढाव आहेत. अशातच आता शमीच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एन्ट्री झाल्याची माहिती आहे.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या सिरीजमधून शमीला ब्रेक दिला आहे. सध्या मोहम्मद शामी सुट्टी एन्जॉय करतोय. नुकतीच त्याने एक बाईक खरेदी केली असून या बाईकसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मोहम्मद शामीने Royal Enfield ची बाइक खरेदी केलीये. या गाडीची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या बाइकचे फिचर्स भन्नाट आहेत. मोहम्मद शमीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बाईकसोबत फोटो पोस्ट केलाय. याला कॅप्शन देताना शमीने cruising partner असं म्हटलं आहे.
शमीच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडलाय. शमीच्या बाइकचे नेटकरी कौतुक करतायत. मोहम्मद शामीने रॉयल एनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी 650 बाइक खरेदी केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, या बाइकची किंमत (एक्स शो रूम) तीन लाख चार हजार रुपये इतकी आहे.
मोहम्मद शमीच्या Royal Enfield Continental GT 650 बाइकमध्ये एकापेक्षा एक उत्तम फिचर्स आहेत. या गाडीचं इंजिन 650 सीसी आहे. त्यासोबतच 6 स्पीडचं मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. फ्यूल टँकची लीमिट 12.5 लीटर इतकी आहे. बाईकचं मायलेज प्रति लीटर सरासरी 25 किलोमीटर इतकं आहे.