Shoaib Akhtar On Michael Vaughan : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) सुरूवातीपासून आत्तापर्यंत टीम इंडियाने दिमाखदार कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत टीम इंडियाने 6 पैकी 6 सामने खिशात घातलेत. त्यामुळे आता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये (World Cup Semi Final) पोहोचणार हे जवळजवळ पक्कं झालंय. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची कामगिरी खास राहिली नाही. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan Cricket) ग्रहण लागलं होतं. पाकिस्तानने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर आता बांग्लादेशविरुद्ध पाकिस्तानने सामना जिंकला अन् सुटकेचा श्वास घेतला आहे. पाकिस्तान एक सामना जिंकला नाही तोवरच क्रिडाविश्वात पुन्हा इंडिया पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मायकल वॉर्न याने केलेल्या एका वक्तव्यावर शोएब अख्तर याने भन्नाट कमेंट केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने (Michael Vaughan) भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ट्विट केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर मायकल वॉर्नने ट्विट करत खळबळ उडवून दिली. कोलकातामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार का? असा हसमुख सवाल मायकलने विचारला. त्यावर अनेकांनी कमेंट करत उत्तर दिलंय. असं व्हायला हवं, असं काही चाहत्यांनी म्हटलंय. तर काहींनी पाकिस्तानी खेळाडूंनी ट्रोल केलंय. त्यावर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने रिट्विट करत उत्तर दिलंय.
शोएब अख्तर वर्ल्ड कप दरम्यान सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचं पहायला मिळालं होतं. शोएबने मायकल वॉनच्या ट्विटला रिट्विट करत खोचक कमेंट केली. 'या गोष्टींनी आमचे आधीही बिघडवले आहे', असं शोएब अख्तर म्हणाला आहे. अख्तर असा का म्हणाला? याची लॉजिक पाहुया...
These things have spoilt us in the past also Vaughany https://t.co/ZFAxwPN0BL
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 1, 2023
वर्ल्ड कप सुरू होण्याआधी पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप जिंकेल, असं काही माजी खेळाडूंनी भाकित केलं होतं. त्यात शोएब अख्तर याचा देखील नंबर लागतो. भारत आणि पाकिस्तान यांच्या वर्ल्ड कप फायनल सामना होईल, असं शोएब अख्तर म्हणाला होता. मात्र, अख्तरची भविष्यवाणी खोटी ठरल्याचं पुन्हा एकदा पहायला मिळालंय. पाकिस्तानच्या उभी कॉलर संघासाठी घातक ठरली. मात्र, टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या दृष्टीने कठोर पाऊल उचलली होती. त्यामुळे टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवता आला आहे.