ठरलं तर! रोहित शर्मासोबत या खेळाडूला MI करणार रिटेन

5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या त्या दोन खेळाडूंची नावंही समोर आली आहेत, ज्यांना कायम ठेवण्यात येणार हे निश्चित आहे.

Updated: Nov 30, 2021, 11:04 AM IST
ठरलं तर! रोहित शर्मासोबत या खेळाडूला MI करणार रिटेन title=

मुंबई : IPL 2022 सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर आयपीएलच्या प्रत्येक टीममध्ये पूर्णपणे बदल दिसून येणार आहेत. मात्र त्याआधी सर्व संघ आज म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत त्या खेळाडूंची नावं निश्चित करणार आहेत, ज्यांना ते लिलावापूर्वी कायम ठेवतील. दरम्यान, 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या त्या दोन खेळाडूंची नावंही समोर आली आहेत, ज्यांना कायम ठेवण्यात येणार हे निश्चित आहे.

मुंबई इंडियन्स 2 खेळाडूंना करणार रिटेन

ESPNcricinfo नुसार, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 वेळा IPLचा चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे ज्याला मुंबई इंडियन्स कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवणार आहे. पण याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे आणखी एक नाव आहे. 

बुमराहलाही टीम त्याला कायम ठेवण्याची खात्री आहे. याशिवाय उर्वरित एक-दोन खेळाडूंबाबत कोणतीही माहिती नाही. ज्यांना हा संघ लिलावापूर्वी कायम ठेवणार आहे.

या खेळाडूंमध्ये टक्कर

रिटेन करण्यासाठी तिसरं नाव किरन पोलार्डचं असू शकतं. पोलार्डही सुरुवातीपासून या संघाच्या पाठीशी उभा राहिला असून, मुंबईला चॅम्पियन बनवण्यासाठी त्यानेही मेहनत घेतली आहे. 

यावेळी दोन खेळाडूंमध्ये काट्याची लढत होणार आहे. युवा यष्टिरक्षक इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंमध्ये टक्कर होणार आहे. या दोन खेळाडूंपैकी मुंबई आज कोणत्याही एका खेळाडूला रिटेन करण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या दृष्टीने, जुन्या आयपीएल फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. 2 नवीन संघांना लिलावापूर्वी काही खेळाडू खरेदी करता येतील अशी सूट असेल, कारण त्यांच्याकडे कायम ठेवण्याचा पर्याय नाहीये.