IPL 2024 Ticket Booking : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर विजयाचा नारळ फोडला आहे. सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर मुंबईने दिल्लीचा (MI vs DC) पाणी पाजत पहिला विजय मिळवला अन् प्लेऑफसाठी इंजिन ऑन केलंय. पॉईंट् टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ 2 अंकांसह 8 व्या स्थानी आहे. मुंबईचा नेट रनरेट -0.704 इतका असल्याने आता आगामी सामन्यात मुंबईला मोठी आघाडी घ्यावी लागणार आहे. अशातच आता मुंबईचा आगामी सामना 9 व्या स्थानी असलेल्या आरसीबीसोबत (MI vs RCB) होणार आहे. मात्र, हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. अशातच आता तुम्ही देखील हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकता.
कसं खरेदी कराल MI vs RCB सामन्याचं तिकीट?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना गुरुवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून खेळवला जाईल. जर तुम्हाला हा सामना मैदानात जाऊन पहायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट खरेदी करून सामन्याचा आनंद घेऊ शकता. तिकिटाचे दर 990 रुपयांपासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन तिकीट खरेदी करायचं असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा... https://in.bookmyshow.com/sports/mumbai-indians-vs-royal-challengers-bengaluru/ET00392851
मुंबई इंडियन्सचा संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तीके चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा आणि क्वेना माफाका.
आरसीबीचा संघ - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक अक्षु डागर, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.