मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम चेन्नई आणि मुंबई दोन्ही टीमसाठी चांगला गेला नाही. मुंबई टीमला एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. तर दुसरीकडे चेन्नई टीम फक्त एकच सामना जिंकली आहे. या दोन्ही टीमसाठी प्ले ऑफचा मार्ग जवळपास बंद झाला आहे.
मुंबई की चेन्नई आज कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई टीमवर यावेळी खूप वाईट स्थिती आली आहे. यंदा एकही सामना जिंकता आला नाही. आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता खूप मोठी आहे.
मुंबई बाहेर होण्याच्या मार्गावर
पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर मुंबई टीम आहे. 6 सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आला नाही. जर मुंबईला प्ले ऑफपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक सामना आता जिंकावा लागेल. तसं झालं नाही तर मुंबई टीम बाहेर होऊ शकते.
चेन्नई टीममध्ये देखील ऋतुराज गायकवाड, मोईन अली फ्लॉप ठरत आहेत. सुरैश रैनाची कमतरता टीममध्ये जाणावत आहे. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वामध्ये चेन्नईला फक्त एकच सामना जिंकला आला. चेन्नईकडून सकारात्मक पुनरागमनाची अपेक्षा आहे.
मुंबई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.
चेन्नई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्रावो, महेश थीक्षाना आणि मुकेश चौधरी