आशिया कपनंतर पाकिस्तानचं मिशन T20-World Cup, असा आखलाय मास्टर प्लॅन

आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पाकिस्तानची टी-20 World Cup साठी नवीन चाल 

Updated: Sep 9, 2022, 05:18 PM IST
आशिया कपनंतर पाकिस्तानचं मिशन T20-World Cup, असा आखलाय मास्टर प्लॅन title=

T-20 World Cup : आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने धडक मारली आहे. पाकिस्तानने भारत, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांना धूळ चारत दिमाखात अंतिम फेरीमध्ये एन्ट्री केली आहे. आता आशिया कपवर नाव कोरण्यापासून पाकिस्तान फक्त एक पाऊल दूर आहे. दुसरीकडे पाकिस्तानने आता टी-20 विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे.  (Matthew Hayden Join Team As a Mentor)

पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनकडे मेंटॉर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये आधीच एका ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट आहे. शॉन टेटच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तानी गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली आहे. 

मॅथ्यू हेडन पाकिस्तान संघासोबत दुसऱ्यांदा जोडला जाणार आहे. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत तो पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार होता. त्यानंतर सुपर 10 लीग सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाने भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांचा पराभव करून सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. 

 

पाकिस्तानी संघाशी पुन्हा जोडलो गेल्याने मी आनंदी आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी मी पाहिले आहे. खास करून भारतावर त्यांनी विजय मिळवला. मला वाटतं की या पाकिस्तानच्या संघात नक्कीच काहीतरी आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियातही पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करेल. मला खात्री आहे की त्यांनी गेल्या वर्षी ज्याप्रकारे यूएईमध्ये कामगिरी केली अगदी तशाच प्रकारचं प्रदर्शन ऑस्ट्रेलियात करतील, असं मॅथ्यू हेडन म्हणाला