'शपथ घे की तू...', नीरजकडून मनू भाकरच्या आईने कोणतं वचन घेतलं? समोर आलं संभाषण

What Manu Bhaker Mother And Neeraj Chopra Talked: या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनूची आई त्याचा हात पकडून नीरजच्या डोक्यावर ठेवते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 14, 2024, 07:49 AM IST
'शपथ घे की तू...', नीरजकडून मनू भाकरच्या आईने कोणतं वचन घेतलं? समोर आलं संभाषण title=
मनू आणि नीरजच्या आईच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल

What Manu Bhaker Mother And Neeraj Chopra Talked: सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं पटकावणारा नीरज चोप्रा आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी मनू भाकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगतेआधी पॅरिसमधील इंडिया हाऊसमध्ये या दोघांची भेट चांगलीच चर्चेत आहे. या भेटीदरम्यान दोघांनी एकमेकांशी टाळलेली नजरानजर सध्या चर्चेत असून दोघांचे या भेटीदरम्यानचे व्हिडीओ पाहून चाहत्यांना या दोघांचं काही आहे की काय असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी तर हे जोडपं फारच छान दिसतंय इथपर्यंत आपल्या कल्पनांचे पतंग उडवले आहेत. या दोघांच्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही असं चाहत्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडीओंमध्ये मनू भाकरच्या आईचाही एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

लग्नाची चर्चा

मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा हे पॅरिसमधील इंडिया हाऊसदरम्यानच्या भेटीमध्ये एकमेकांशी बोलताना दिसले. मात्र यावेळेस सुमेधा भाकर यांनी नीरजबरोबर आपुलकीने बोलताना थेट त्याला उजवा हात धरुन आपल्या डोक्यावर ठेवत शपथ घ्यायला लावल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहूनच काहींना मनूची आई मुलीबरोबर लग्न करण्यासंदर्भात नीरजकडून वचन वगैरे तर घेत नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. खरं तर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओंमध्ये हे दोघे काय बोलत आहेत हे ऐकू येत नाहीये. पण आता एका पोस्टमधून दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

काय म्हणाली मनूची आई?

मनू भाकरची आई नीरजबरोबर त्याच्या कामगिरीची चर्चा करत होती. त्यावेळेस तिने अचानक नीरजचा उजवा हात पकडून स्वत:च्या डोक्यावर ठेवला. यावेळेस त्यांनी, "तू टेन्शन घेणार नाहीस, अशी शपथ घे" असं म्हणत नीरजचा हात डोक्यावर ठेवला. तसेच पुढे बोलताना, 'विश्रांती घे आणि नंतर अधिक मेहनत कर,' असं सुमेधा भाकर यांनी दोन वेळा पदक जिंकणाऱ्या नीरजला सांगितलं.  नीरजला स्पोर्ट्स हर्नियालाचा त्रास आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकनंतर तो पुढील महिनाभर जर्मनीमध्ये असणार आहे. इथे त्याच्यावर उपचार केलं जाणार आहे.

दोघांचीही ऐतिहासिक कामगिरी

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक कटकावलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक कटकावलं होतं. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारे तो पहिला भारतीय ठरला आहे. तर मनू भाकरने एकेरी आणि मिश्र सांघिक 10 मीटर पिस्तूल शुटींगमध्ये कांस्य पदकांवर नाव कोरली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतामधील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.