मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, पाहा व्हिडीओ

तुम्हाला मेट्रो-बस किंवा लोकलमध्ये बसायला जागा मिळत नसेल तर एकदा हा जुगाड तर पाहा

Updated: Jun 12, 2021, 10:23 AM IST
मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: मेट्रो सिटीमध्ये कामाला जाणाऱ्या प्रत्येकाचं दु:ख म्हणजे लोकल, मेट्रो किंवा मोनो किंबा बस कुठेही बसायला सीट मिळणं. चौथी का असेना पण ती मिळाली तरी जीव भांड्यात पडतो. ही सीट मिळवण्यासाठी किती जुगाड आणि किती कसरती कराव्या लागतात हे मुंबई-दिल्लीकरांना चांगलंच ज्ञात आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर मेट्रोतील एका अजब जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मेट्रोमध्ये गर्दी असल्यानं या तरुणाला बसायला जागाच मिळत नव्हती. जागा मिळवण्यासाठी तरुणाने एक जुगाड केला आहे. या तरुणाला त्या जुगाडानंतर सीट देखील मिळते. सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेक युझर्सनी खूप कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tube indian (@tube.indian)

या व्हिडीओमध्ये तरुण अचानक थरथर कापताना दिसत आहे. मध्येच थांबतो त्याला असं कापताना पाहून सर्वजण त्याला बसण्यासाठी जागा रिकामी करून देतात. तो जागेवर बसतो आणि पुन्हा तशीच नक्कल करतो. पुढच्या काही सेकंदात हा तरुण नॉर्मल मोडवर येतो असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युझर्स आपलं हसणं रोखू शकले नाहीत. तर काहींनी त्याच्या जुगाडू वृत्तीचं कौतुकही केलं आहे.