Maharashtra Kesari Kusti Final 2023 : महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेमध्ये अंतिम लढत, कोण होणार महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी

महेंद्र बाहुबलीची महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक, सिकंदर शेख पराभूत

Updated: Jan 14, 2023, 06:59 PM IST
Maharashtra Kesari Kusti Final 2023 : महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेमध्ये अंतिम लढत, कोण होणार महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी title=

Maharashtr kesari 2023 final : महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातील पहिली सेमी फायनल पार पडली. यामध्ये सिकंदर शेखचा महेंद्र गायकवाडने (Mahendra Gaikwad) पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीय. तर गादी विभागामध्ये शिवराज राक्षेने एकतर्फी मैदान मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एकवेळा  महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या हर्षवर्धन सदगीरवर शिवराजने एकतर्फी आखाडा मारला. (Mahendra Gaikwad vs Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023 Final)

कुस्ती चालू झाल्यावर महेंद्र गायकवाडने पहिला गुण मिळवत खातं उघडलं होतं. परंतु पहिल्या फेरीअखेर सिकंदरकडे 1 गुणांची आघाडी होती. दुसरी फेरी सुरू होताच सिकंदर आक्रमक झालेला दिसला. मात्र उच पुरा गडी महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत 4 गुणांची कमाई केली. सिकंदरला सामन्याच्या अखेरपर्यंत सरशी साधू दिली नाही. सिंकदरचा 6-4 ने महेंद्रचा पराभव केला आहे.  (maharashtra kesari kusti 2023 semi final mahendra gaikwad won against sikandar sheikh match)

गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या तुफान कुस्तीमध्ये पहिल्या पासूनच शिवराजने आक्रमण केलं. पहिल्या फेरी अखेर शिवराजने 6 गुण मिळवले होते तर एकवेळचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनला एकही गुण घेता आला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये 1 गुण सोडता शिवराजने 2  गुणांची विजयी आघाडी घेत विजय साकार केला. शिवराज राक्षेने हर्षवर्धनवर 1-8 ने विजय मिळवला.

दरम्यान,  65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी धडक मारली आहे. अंतिम सामन्यामध्ये कोण चांदीची गदा उंचावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  महाराष्ट्र केसरीसाठी अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि  उत्तरप्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पहिली फेरी 3 मिनिट 
हर्षवर्धन सद्गीर 0 गुण
शिवराज राक्षे 6 गुण

दुसरी फेरी 3 मिनिट
हर्षवर्धन सद्गीर 1 गुण
शिवराज राक्षे 2 गुण

निकाल 8-1 ने शिवराज राक्षे विजयी