नई दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 मध्ये नॉटिंघमशायरचा गोलंदाज ल्यूक फ्लेचरला डोक्याला बॉल लागल्याने जखमी झाला आहे. ल्यूकने त्याच्या ओव्हरचा पहिला बॉल टाकला आणि स्ट्राइकवर असणाऱ्या सॅम हेनने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. हा जोरात शॉटचा बॉल सरळ बॉलर ल्यूकच्या डोक्याला लागला.
बॉल लागताच फ्लेचर जमीनवर पडला. अंपायरने तत्काळ मेडिकल एमरजेंसीचा इशारा करत फ्लेचरच्या डोक्याला टॉवेलने झाकलं आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.
ल्यूक फ्लेचरने पहिल्या बॉलसाठी रन अप घेतला. त्याने जसा पहिला बॉल टाकला तसा बॅट्समन सॅम हेनने बॉल पूर्ण ताकदीने मिड विकेटच्या बाजूने मारला. तेव्हा बॉलर फ्लेचर शॉटमध्ये आला. या घटनेनंतर इतर खेळाडू देखील घाबरले. ल्यूकला लगेचच दवाखान्यात नेण्यात आलं आणि सामना रद्द केला गेला. फ्लेचर हा आता धोक्यातून बाहेर असल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडिओ