MI vs CSK : वानखेडेवर पैसा वसूल...! धोनीचा तडाखा अन् रोहितचं शतक, अखेर चेन्नईच सुपर 'किंग'

MI vs CSK Live Score, IPL 2024 : आयपीएल इतिहासातील पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings ) यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या रोमांचक लढतीत कोण जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

MI vs CSK : वानखेडेवर पैसा वसूल...! धोनीचा तडाखा अन् रोहितचं शतक, अखेर चेन्नईच सुपर 'किंग'

Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Score in Marathi : वर्षानुवर्षे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या चेन्नई आणि मुंबईच्या संघात आज काटे की टक्कर होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएल मोसमाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठीअत्यंत खराब झाली. परंतू मागील दोन सामन्यात पुनरागमन करणाऱ्या मुंबईसमोर आता तगड्या चेन्नईचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे ऋतुराजच्या नेतृत्वात आणि थाला धोनीच्या आशीर्वादाने चेन्नईने देखील तीन सामना पारड्यात टाकले आहेत. त्यामुळे आता 'साहेब vs वस्ताद' असा समाना यंदाही पहायला मिळेल. 

14 Apr 2024, 23:22 वाजता

चेन्नई सुपर किंग्सने, मुंबई इंडियन्सचा किल्ला मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर आपला विजय नोंदविला आहे. चेन्नईने मुंबईला 20 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 166 च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत 105 धावांची नाबाद खेळी खेळली. रोहित शर्माच्या या खेळीमध्ये एकूण 11 चौकार आणि 5 षटकार सामील होते. रोहित शर्माने या इनिंगसोबतच टी20 मध्ये 500 षटकार मारण्याचा विक्रमसुद्धा आपल्या नावावर केला आहे.

तर गोलंदाजीत पाथिरानाने 4 विकेट घेत, पूर्ण मुंबईच्या फलंदाजीला धाराशाही केले. मुस्ताफिजूर आणि देशपांडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. या विजयासोबत सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

14 Apr 2024, 23:11 वाजता

चेन्नईच्या पाथिरानाने शेपर्डची विकेट घेत, सामन्यात आपली पकड बनवली आहे. पाथिरानाने या सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत.  

14 Apr 2024, 23:06 वाजता

17 व्या ओव्हरमध्ये टीम डेविड हा 13 धावा करून बाद झाला आहे. पाचव्या विकेटनंतर रोमारिओ शेपर्ड हा फलंदाजीसाठी आला आहे.

14 Apr 2024, 22:56 वाजता

तुषार देशपांडेच्या 16 व्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या हा केवळ 1 धाव बनवुन बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर मैदानावर टीम डेविड आला आहे.

14 Apr 2024, 22:47 वाजता

15 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 132-3  असा आहे. रोहित शर्मा 77 धावांवर, तर हार्दिक पांड्या हा आताच मैदानावर आला असून 1 वर खेळत आहे. 

14 Apr 2024, 22:45 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये परत एकदा पथिरानाने चेन्नईला मॅचमध्ये आणलं आहे. सेट दिसत असलेल्या तिलक वर्मा हा 31 धावा बनवुन आउट झाला आहे. 

14 Apr 2024, 22:31 वाजता

11 व्या ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 108-2 असा आहे. रोहित हा 66 धावांवर, तर तिलक हा 19 धावांवर खेळत आहे. रोहित-तिलक यांच्यात 38 धावांची भागीदारी झाली आहे.

14 Apr 2024, 22:25 वाजता

मुंबईच्या रोहित शर्माने केवळ 30 चेंडूत आपलं अर्धशतक 7 चौके आणि 2 षटकारांच्या मदतीनं पूर्ण केलं आहे. रोहित आणि तिलक यांना आता चांगली भागीदारी करण्याची गरज आहे.

14 Apr 2024, 22:19 वाजता

पथिरानाने एकाच ओव्हरमध्ये मुंबईच्या फलंदाजीला दोन धक्के दिले आहेत. इशानच्या विकेटनंतर लगेच सुर्याकुमार हा शून्यावर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे.

14 Apr 2024, 22:12 वाजता

चेन्नईचा वेगवान गोलंदाज पथिरानाने 8 व्या ओव्हरमध्ये इशान किशनला 23 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर सुर्याकुमार यादव हा फलंदाजीला आला आहे.