भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.

Updated: Aug 24, 2017, 05:00 PM IST
भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह title=

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. श्रीलंकेविरोधात पहिल्या वनडेमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय टीममध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. विजयचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम प्रयत्न करणार आहे.

श्रीलंकेसाठी मात्र हा सामना थोडा कठिण असणार आहे. या मैदानावर दोन्ही संघामध्ये झालेल्या मागच्या टेस्टमध्ये भारताने १ इंनिग आणि १७१ रनने सामना आपल्या नावे केला होता.

श्रीलंकेची वनडे सिरीजमध्ये चांगली सुरुवात नाही झाली. मोठ्या स्कोरचा पाठलाग करतांना टीमची बॅटींग लाईनअप इतक्या मजबूत स्थितीत नसल्याचं समोर आलं. याउलट भारताची टॉप ऑर्डर बॅट्समन चांगल्या फार्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात ओपनर बॅट्समन शिखर धवनने शानदार शतक ठोकलं. तर कर्णधार विराट कोहलीने ८२ रनची चांगली खेळी केली.