या दिग्गज फुटबॉलपटूसह 4 खेळाडूंना कोरोनाची लागण, क्रीडा क्षेत्रात खळबळ

क्रीडा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jan 2, 2022, 06:20 PM IST
या दिग्गज फुटबॉलपटूसह 4 खेळाडूंना कोरोनाची लागण, क्रीडा क्षेत्रात खळबळ title=

मुंबई : जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सी सध्या पीएसजी क्लबशी (psg club) संबंधित असून या क्लबने याबाबत माहिती दिली आहे. क्रीडाविश्वात आजकाल अनेक खेळाडू कोरोनाला बळी पडत आहेत, त्यात नवीन नाव आता मेस्सीचं ही जुडलं आहे. मेस्सीशिवाय क्लबच्या आणखी तीन खेळाडूंना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. क्लबने माहिती दिली की, सर्व खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि ते सध्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आहेत.

पीएसजीचा संघ (PSG team) सध्या फ्रेंच चषक (French Cup) स्पर्धेत भाग घेत आहे, जिथे सोमवारी व्हॅनेसचा सामना होणार होता. मात्र, कोरोनाचे चार रुग्ण समोर आल्यानंतर संघात खळबळ उडाली आहे. क्लबच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, परंतु सर्वांना अलग ठेवण्यात आले आहे. मेस्सीने गेल्या वर्षी बार्सिलोना सोडून पीएसजीमध्ये प्रवेश केला होता.

मेस्सीसह चार खेळाडूंना संसर्ग 

पीएसजीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संघातील एका कर्मचाऱ्यालाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. क्लबने सुरुवातीला खेळाडूंची नावे उघड केली नाहीत, वैद्यकीय पथकाने नंतर त्यांच्या निवेदनात सांगितले की, मेस्सी व्यतिरिक्त लेफ्ट-बॅक हुआ बर्नेट, बॅकअप गोलकीपर सर्जियो रिको आणि 19 वर्षीय मिडफिल्डर नॅथन बिटुमझाला यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. याआधी मोनॅको टीम मध्ये ही कोरोनाचे सात प्रकरणे आढळली होती. मात्र, त्यांच्यापैकी कोणालाही कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.

ईपीएलचे सामनेही पुढे ढकलले

न्यूकॅसल संघात सतत कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर रविवारी साउथम्प्टन येथे होणारा इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ईपीएलने ही माहिती दिली. न्यूकॅसलचा एव्हर्टनविरुद्धचा गुरुवारचा सामनाही पुढे ढकलण्यात आला होता. प्रीमियर लीगने म्हटले आहे की, न्यूकॅसलकडे कोविड-19 प्रकरणे आणि दुखापतींमुळे सामना खेळण्यासाठी 13 खेळाडू आणि एक गोलकीपर नाही. लीगने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रभावित क्लब आणि त्यांच्या चाहत्यांना स्पष्टता देण्यासाठी त्यांनी सामन्याबाबत वेळेवर निर्णय घेतला.