टेनिसपटू लिएंडर पेस २०२० च्या मौसमानंतर निवृत्त होणार

 चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत केली घोषणा 

Updated: Dec 26, 2019, 11:42 AM IST
टेनिसपटू लिएंडर पेस २०२० च्या मौसमानंतर निवृत्त होणार  title=

मुंबई : भारताचा स्टार टेनिस खेळाडू लिआंडर पेस २०२०च्या मौसमानंतर टेनिस जगतातून निवृत्त होतो आहे. आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतांना त्यानं ही घोषणा केली आहे. ४६ वर्षीय पेसनं १९९१ साली टेनिस करिअरची सुरुवात केली. पेसनं आजवर १८ ग्रँड स्लॅम जिंकले असून त्यातील आठ पुरुष दुहेरी तर १० मिश्र दुहेरी प्रकारातील आहेत. पेसच्या एकूण ६६ स्पर्धा जिंकल्या असून १९९६ साली झालेल्या अटलंटा ऑलंपिकमध्ये त्यानं कांस्य पदक पटकावलं होतं. नुकत्याच झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना पेसनं ४४ व्या दुहेरी प्रकारातील विजयाला गवसणी घातली. 

 

पेसने म्हटलं की, 'मी ही घोषणा करतो आहे की, एक टेनिसपटूच्या रुपात २०२० हे माझं शेवटचं वर्ष असेल. सगळ्य़ात आधी मी माझे आई-वडील यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमी मला मार्गदर्शन, शिस्त आणि ते वातावरण दिलं ज्यामुळे मी आज येथे पोहोचलो आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य मला प्रेम दिलं. तुमच्या प्रेमाशिवाय काहीच मिळवणं शक्य नव्हतं. मी तुमच्यावर प्रेम करतो.'

पेसने त्याची बहिण जॅकलीन आणि मारिया यांना देखील धन्यवाद म्हटलं आहे. 

लिएंडर पेसचं यश आणि सन्मान

8 डबल्स ग्रँड स्लॅम
10 मिक्स्ड डबल्स ग्रँड स्लॅम
1996 अटलांटा ओलिंपिक कांस्य पदक
7 मेडल एशियन गेम्स ( पाच गोल्ड मेडल)
1 मेडल कॉमनवेल्थ गेम्स 
1990 मध्ये अर्जुन पुरस्कार
1996-97 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
2001 मध्ये पद्मश्री
2014 मध्ये पद्मभूषण