मुंबई : विराट कोहली हा आज जगातील सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी क्रिकेट या क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून विराटने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपला त्याचे फॅन्स तयार केले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या यशामागे एक अशी कहाणी आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव आज दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पण, एक वेळ अशी आली जेव्हा त्याला खूप संघर्ष करावा लागला. 'Unacademy' ऑनलाइन क्लासमध्ये, कोहली आणि त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी संघर्षाबद्दल स्पष्टपणं सांगितलं आहे.
कोहलीने सांगितले की, एकदा त्याची स्टेट टीममध्ये निवड झाली नव्हती. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि रात्रभर रडत राहिला.
भारतीय कर्णधार म्हणाला, मी सर्व सामन्यांमध्ये चांगले रन्स केले होते. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. लोकही माझ्या कामगिरीवर खूश होते. मी प्रत्येक स्तरावर चांगली कामगिरी केली. असे असूनही मला नाकारण्यात आलं. याबद्दल मी माझ्या प्रशिक्षकाशी 2 तास बोललो. माझा विश्वास आहे की जिथे संयम आणि बांधिलकी असते तिथे आपोआप प्रेरणा मिळते आणि यश मिळते."
दरम्यान ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये आज भारत आणि स्कॉटलंड यांच्यात सामना रंगणार आहे. हा महत्त्वाचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर वाढदिवसाच्या निमित्ताने सामन्यात विजय मिळवून कोहलीला बर्थडे गिफ्ट मिळणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.