Ind vs Eng T20 : तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या निर्णयावर लक्ष्मण हैराण

 भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या हैराण करणाऱ्या निर्णयांमुळे ओळखला जातो.

Updated: Mar 16, 2021, 08:52 PM IST
Ind vs Eng T20 : तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या निर्णयावर लक्ष्मण हैराण title=

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या हैराण करणाऱ्या निर्णयांमुळे ओळखला जातो. इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये पहिल्या 3 सामन्यांमध्ये जे निर्णय घेतले. तो दिग्गजांना हैराण करणारा आहे. रोहित शर्माला बाहेर बसवणं किंवा शिखर धवनला संघातून वगळणं यामुळे विराटवर आधीही जोरदार टीका झाली. 

विराटने इंग्लंडच्या विरुद्ध टी20 सीरीजमध्ये घेतलेले निर्णय़ अनेकांना हैराण करणारे आहेत. रोहित शर्मा विश्रांती दिली गेली. शिखर धवनला एकच सामन्यात खेळवलं. त्यानंतर बाहेर बसवलं. केएल राहुलला तिसरी संधी दिली पण त्यातही तो फेल झाला. तिसऱ्या सामन्यात केएल राहुल शुन्यावर आऊट झाला. डेब्यू केल्यानंतर सूर्यकुमार यादवला बाहेर करणं.

धवनला एका सामन्यानंतर बाहेर केल्यानंतर यावर गौतम गंभीर याने देखील टीका केली होती. आता माजी दिग्गज खेळाडू व्ही.व्ही एस लक्ष्मणने देखील तिसऱ्या टी20 मध्ये प्लेईंग इलेवनबाबत म्हटलं की, तुम्ही अशा प्रकारे संघात कसा बदल करु शकता. ?

याआधी दुसऱ्या टी20 मध्ये लक्ष्मणने म्हटलं होतं की, जसे 2019 वर्ल्डकपमध्ये अंबाती रायडूला लागोपाठ चौथ्या क्रमांकासाठी असलेल्या खेळाडू सांगितलं गेलं. पण त्याला एक सीरीज खराब खेळल्यामुळे संघातून बाहेर केलं गेलं. ज्यामुळे त्याची किंमत ही मोजावी लागली. न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये भारताला ज्या खेळाडूची गरज होती. तो रायडूच होता. अचानक मध्येच विजय शंकरला संधी दिली गेली. जो चर्चेत देखील नव्हता.

टॉस जिंकत इंग्लंडने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्माने 15, इशांत किशनने 4, विराट कोहलीने नाबाद 77, पंतने 25, श्रेयस अय्यरने 9 आणि हार्दिक पांड्याने 17 रन केले. केएल राहुल शुन्यावर आऊट झाला.

भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 156 रन केले. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 आणि ख्रिस जॉर्डनने 2 विकेट घेतल्या.