'हा' विक्रम करणारा कुलदीप यादव पहिला भारतीय

आतापर्यंत आशिया खंडाबाहेर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ किंवा त्या पेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी कुलदीपला वगळता कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आली नाही.

Updated: Jan 6, 2019, 09:29 PM IST
'हा' विक्रम करणारा कुलदीप यादव पहिला भारतीय title=

सिडनी : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. तर चौथा कसोटी सामना हा निर्णायक अवस्थेमध्ये पोहोचला आहे. या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अनेक नव्या विक्रमाची नोंद केली. यासोबतच चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर देखील एक भन्नाट विक्रम नोंदवण्यात आला आहे.

सिडनी कसोटीतील पहिल्या डावात कुलदीप यादवने ९९ धावा घेऊन भारताला ५ विकेट मिळवून दिल्या. यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याच्या विकेटचा देखील समावेश आहे. यासोबत तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ५ विकेट्स घेणार दुसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम सर्वात आधी इंग्लंडच्या जॉनी वॉर्डल यांनी १९५५ साली सिडनीतच पाच विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजी करताना त्याने टीम पेनचा झेल घेतला. या ५ विकेट घेण्यासोबत आशिया खंडाबाहेर, कसोटी, एकदिवसीय, टी-२० अशा तीन्ही क्रिकेट प्रकरात ५ विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.

इंग्लंडविरुद्ध ३ जुलै २०१८ ला झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात 24 धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या वर्षी १२ जुलैला इंग्लंड येथील ट्रेटं ब्रिजयेथील सामन्यात आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजाना हैराण केले होते. त्याने केवळ २५ धावा देत तब्बल ६ विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत आशिया खंडाबाहेर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५ किंवा त्या पेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी कुलदीपला वगळता कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आली नाही.