मॅचमध्ये कृणाल पांड्याकडून मुंबईच्या खेळाडूला KISS, व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या मॅचमध्ये दोस्ताना! कृणाल पांड्याकडून खास मित्राला भरमैदानात KISS   

Updated: Apr 25, 2022, 11:19 AM IST
मॅचमध्ये कृणाल पांड्याकडून मुंबईच्या खेळाडूला KISS, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : मुंबई विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात अनोखा दोस्ताना पाहायला मिळाला. या सामन्यात पुन्हा एकदा कृणाल पांड्या चर्चेत आला. कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड यांची दोस्ती सर्वांना माहीत आहे. टीम बदलल्या तरी मैत्रीचा ओलावा तसाच राहिला आहे हे सांगणारा व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईकडून खेळताना पोलार्ड 19 धावा करून आऊट झाला. त्यानंतर तो तंबुत जात असताना कृणाल पांड्याने त्याला मागून मिठी मारली आणि KISS केलं. कृणाल पांड्याने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.

कृणाल पांड्या आणि पोलार्ड खूप चांगले मित्र आहेत. मुंबई टीममधून ते दोघं खेळत असताना त्यांच्या मैत्रीची चर्चा होत असे. आता दोघंही वेगळ्या टीममधून खेळत असताना त्यांच्यातील मैत्री तुटली नाही तर अजूनही टिकून आहे. त्याचं हा व्हिडीओ उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लखनऊ टीमने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. मुंबई टीमचा सलग 8 वा पराभव आहे. मुंबई टीम या पराभवानंतर प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. पांड्यासमोर पोलार्ड फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने मित्र म्हणून जीवदान दिलं नाही तर पोलार्डची विकेट घेतली. 

सोशल मीडियावर कृणाल आणि पोलार्डच्या मैत्रीचा खास व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.