भारत-आयर्लंड सीरिजमध्ये रेकॉर्डचा पाऊस

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Updated: Jun 30, 2018, 08:05 PM IST
भारत-आयर्लंड सीरिजमध्ये रेकॉर्डचा पाऊस  title=

मालाहाईड : आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा शानदार विजय झाला. दोन्ही मॅचमध्ये भारत अगदी सहज जिंकला. या दोन्ही मॅचदरम्यान भारतानं अनेक रेकॉर्ड नावावर केली. 

भारताची रेकॉर्ड

- दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा सगळ्यात मोठा विजय (१४३ रननी). आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा दुसरा मोठा विजय होता. श्रीलंकेनं केनियाचा १७२ रननी पराभव केला होता. 

- दुसऱ्या टी-२०मध्ये आयर्लंडचा ७० रनवर ऑल आऊट, भारतानं पहिल्यांदाच एवढ्या कमी स्कोअरवर टीमला ऑल आऊट केलं. याआधी भारतानं इंग्लंडला ८० रनवर ऑल आऊट केलं होतं. आयर्लंडचा हा दुसरा खराब स्कोअर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध आयर्लंडची टीम ६८ रनवर ऑल आऊट झाली होती. 

- या मॅचमध्ये भारतानं १२ सिक्स मारले. यामध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे. याआधी चार वेळा १२ किंवा त्यापेक्षा जास्त सिक्स मारले गेले होते. 

- टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक वेळा २०० रन बनवण्याच्या रेकॉर्डची भारतानं बरोबरी केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं आत्तापर्यंत एकूण ११ वेळा २०० रनचा टप्पा ओलांडला. ११ पैकी १० वेळा भारताचा विजय झाला. आफ्रिकेला मात्र ८ वेळाच विजय मिळवता आला. 

- पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मा- शिखर धवनची १६० रनची पार्टनरशीप भारतासाठी दुसरी सगळ्यात मोठी. याआधी मागच्या वर्षी भारत श्रीलंका मॅचमध्ये रोहित आणि लोकेश राहुलनं १६५ रनची पार्टनरशीप केली होती. 

- दुसऱ्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यानं ३५५.५५ च्या स्ट्राईक रेटनं ९ बॉलमध्ये ३२ रन केले. एवढ्या स्ट्राईक रेटनं (३० रनपेक्षा जास्त) रन करणारा पांड्या हा तिसरा खेळाडू आहे. न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो (श्रीलंकेविरुद्ध ३५७.१४ स्ट्राईक रेट) आणि युवराज सिंग (इंग्लंडविरुद्ध ३६२.५० स्ट्राईक रेट) हे दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर आहे. 

- दुसऱ्या मॅचमध्ये सुरेश रैनानं ६९ रनची खेळी केली. २०१८ या वर्षामध्ये रैनानं टी-२० मध्ये एक हजार रन पूर्ण केले. सुरेश रैनानं या वर्षात १०३० रन केल्या आहेत. रैनानं २०१० साली सर्वाधिक १०४२ रन केल्या होत्या. 

- दोन आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक वेळानंतर खेळणारा खेळाडू म्हणून उमेश यादवचं रेकॉर्ड झालं आहे. ६५ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचनंतर पुन्हा भारताकडून खेळला. याआधी उमेश यादव शेवटची आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच ७ ऑगस्ट २०१२ साली खेळला होता.