मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मात्र आयपीएलमध्ये स्टार परफॉरमन्स दिलेल्या अनेक खेळाडूंना टीम इंडियात जागा न मिळाल्याने अनेक खेळाडूंची नावे समोर येत आहेत. तसेच सिलेक्टर्सवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
22 मे रोजी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला, मात्र या संघात 19 वर्षीय युवा फलंदाज तिलक वर्माचा समावेश करण्यात आलेला नाही. तिलक वर्मा याने आयपीएल 2022 मध्ये महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला अनेक सामने जिंकून दिले.
पण निवडकर्त्यांचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही.'
माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?
रोहित शर्माने नुकतेच आयपीएलमध्ये सांगितले होते की, तिलक वर्मा आगामी काळात टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळू शकतो, असा त्याने विश्वास दाखवला होता.
रोहितच्या या विधानावर सुनील गावस्कर म्हणाले होते, 'रोहित शर्माने अगदी बरोबर सांगितले आहे की तिलक वर्मा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू होऊ शकतो. त्यामुळे आता थोडे आणखीण मेहनत करावी, फिटनेस सुधारावे, तंत्र सुधारणे आणि स्वत:ला सिद्ध करणे हे त्याच्यावर अवलंबून आहे.
आयपीएल कामगिरी
तिलक वर्मा हा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. तिलक वर्माने IPL 2022 च्या 12 सामन्यांमध्ये 40.89 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतकेही झळकली आहेत.