KKR vs SRH Final Washout Scenario: आज चेन्नईनच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलचा फायनल सामना रंगणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायजर्ड विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी पावसाचं सावट असल्याची माहिती आहे. शनिवारी या ठिकाणी अचानक पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकात्याच्या टीमला प्रॅक्टिस सेशन मध्येच सोडून माघारी परतावं लागलं. शनिवारी, हैदराबादच्या खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता प्रश्न उपस्थित होतोय की, फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणती टीम होणार विजयी?
आता KKR vs SRH फायनलबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतातय. जर आजच्या दिवशीही पाऊस पडला तर काय होईल? आयपीएल 2023 प्रमाणे आयपीएल 2024 फायनलसाठी रिझर्व डे आहे की नाही? असे सवाल चाहत्यांच्या मनात आहेत. पावसामुळे राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही, तर विजेता कोण होणार हे जाणून घेऊया.
Accuweather च्या अहवालानुसार, KKR vs SRH फायनलच्या दिवशी म्हणजे 26 मे रोजी पावसाचा अंदाज नाही. परंतु वाचावरण ढगाळ असून कमी आर्द्रता असण्याची शक्यता आहे. याशिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील रामल चक्रीवादळामुळे पावसाचा धोका नाकारता येत नाही.