विराट नाही तर या क्रिकेटरसोबत डेटवर जायचयं अभिनेत्री कियाराला

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्यावर आधारित बायोपिक 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' मधील अभिनेत्री कियारा अडवाणीने एक खुलासा केला आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 15, 2017, 12:00 AM IST
विराट नाही तर या क्रिकेटरसोबत डेटवर जायचयं अभिनेत्री कियाराला title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्यावर आधारित बायोपिक 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' मधील अभिनेत्री कियारा अडवाणीने एक खुलासा केला आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीची भूमिका केली आहे.

कियारा अडवाणीने टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन विराट कोहली याला सर्वात हॉट क्रिकेटर म्हटलं आहे. मात्र, ज्यावेळी कियाराला प्रश्न विचारण्यात आला की, तुला डिनरला कुणासोबत जायला आवडेल? त्यावेळी कियारा अडवाणीने थेट उत्तर दिलं.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कियारा अडवाणीला विचारलं की, तुला कुठल्या क्रिकेटरसोबत कँडल लाईट डिनर करायला आवडेल? या प्रश्नावर कियाराने म्हटलं की, मला महेंद्रसिंग धोनीसोबत डिनरला जायला आवडेल. तसेच तीने पुढे म्हटलं की, मला धोनीसंदर्भात आणखीन खूपकाही जाणून घ्यायचं आहे.

कियाराने सांगितलं की, "मला कँडल लाईट डिनरबाबत माहिती नाही पण केवळ डिनरचं म्हटलं तर, धोनीसोबत डिनर करायला आवडेल. त्यामुळे मला धोनीसंदर्भात आणखीन काही माहिती मिळवता येईल. ज्या पद्धतीने धोनी आपली मुलगी आणि पत्नी यांची काळजी घेतो ते कौतुकास्पद आहे. धोनी खूपच डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे.