नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसर याला जेलची हवा खावी लागली आहे. हे प्रकरण थोडं जुनं आहे पण याची माहिती स्वतः पीटरसन याने दिली आहे.
पीटरसन याने आपल्या अटकेची बातमी ट्विटरवर शेअर केली. पोस्ट झाल्यावर ही बातमी सोशल मीडियावर वणव्याप्रमाणे पसरली. अनेक वर्तमानपर्त्र आणि टीव्ही न्यूज चॅनलमध्ये ही मुख्य बातमी होती.
पीटरसनने जिनीव्ही एअरपोर्टवर गोल्फ स्टीक फिरवली होती. हा कायद्याचा भंग आहे त्यामुळे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे पीटरसनला एअरपोर्टच्या जेलमध्ये काही काळासाठी ठेवण्यात आले होते.
Held in a cell in Geneva airport today. That wasn't fun! Partial arrest for a HOPELESS golf swing! pic.twitter.com/cPaAIES1cI
— KP (@KP24) September 10, 2017
यानंतर पीटरसनने ट्वीट करून सांगितले की, आज जिनीव्हा एअरपोर्टमध्ये बंद आहे, ही मस्करी नाही. गोल्फ स्टीक एअरपोर्टमध्ये फिरवल्याने मला अटक करण्यात आले आहे. दरन्यान काही काळानंतर पीटरसनला सोडण्यात आले.
पीटरसनने इंग्लिश क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने काउंटी क्लब सरेकडून आपला शेवटचा सामना खेळला होता. पीटरसन याने १०४ टेस्टमध्ये ४७.२८च्या सरासरीने एकूण ८ हजार १८१ धावा काढल्या. आपल्या करिअरमध्ये २३ शतक आणि ३५ अर्धशतक बनविले. वन डेमध्ये १३६ सामने खेळले त्यात ९ शतक आणि २५ अर्धशतक कर ४०.७३च्या सरासरीने ४४४० धावा केल्या.