केनियाचा कॉसमस लॅगट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता

42 किमीच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील आठ हजारांहून स्पर्धक सहभागी झाले. 

Updated: Jan 20, 2019, 11:42 AM IST
केनियाचा कॉसमस लॅगट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता title=

मुंबई:१६ व्या मुंबई मॅरेथॉनला रवीवारी सकाळी सुरुवात झाली. केनियाचा कॉसमस लॅगट विजयी ठरला ठरला. दुसऱ्या क्रमांकावर तर आयच्यू बँटी आणि तिसऱ्या क्रमांकावर शुमेट अक्लॉन्व यांनी विजेतेपद पटकावले. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीच्या नितेंद्र सिंग रावत याने बाजी मारली आहे.  तर भारतीय महिला गटात सुधा सिंह विजेती ठरली. 42 किमीच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील आठ हजारांहून स्पर्धक सहभागी झाले. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात श्रीणू मुगाता प्रथम, करण थापा द्वितीय, तर कालिदास हिरवेनं तृतीय स्थान पटकावले. तर महिला गटात राजस्थानच्या मीनू प्रजापतीने प्रथम स्थान पटकावले. साईगीता नाईकने दुसरा तर मंजू यादवने तिसरा क्रमांक पटकावले.

 

बॉक्सर मेरी कॉमच्या हस्ते ४२ किमी मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला. या मॅरेथॉनमध्ये जवळपास ४६ हजार धावपटू सहभागी झालेत. जगभरातल्या धावपटूंसोबत सामान्य मुंबईकर, उद्योगपती, सेलिब्रिटीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत... ४२ किमीची पूर्ण, २१ किमीची अर्ध, ड्रीम रन आणि ज्येष्ठ नागरिक अशा गटात ही मॅरेथॉन पार पडली.वरळी डेअरीपासून या अर्ध मॅरेथॉनला सुरूवात झाली. आमदार सुनील शिंदे यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. २१ किलोमीटरची ही हाफ मॅरेथॉन होती. 

१६व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ज्येष्ठ नागरिकांसाठीची मॅरेथॉन सात वाजून  पन्नास मिनिटांनी सुरु झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला. जवळपास ४.२ किमीचं अंतर या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांना कापावे लागले. या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहायला मिळला तरुणाईला लाजवेल असा ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह १६ व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळाला.