Kaviya Maran | सनरायझर्स हैदराबादसाठी बोली लावणारी ही तरुणी आहे तरी कोण?

IPL Mega Auction 2022 लिलावात सनरायझर्स हैदराबादकडून बोली लावणाऱ्या काव्या मारन कोण आहेत?

Updated: Feb 12, 2022, 09:55 PM IST
Kaviya Maran | सनरायझर्स हैदराबादसाठी बोली लावणारी ही तरुणी आहे तरी कोण? title=

मुंबई : न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलेली काव्याला क्रिकेटची आवड आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्या मारन संघाची रणनीती विकसित करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सोबत काम करते.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलाव 12 फेब्रुवारीपासून बंगळुरूमध्ये सुरू झाला. लिलावादरम्यान संघाच्या सीईओ काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या टेबलावर दिसल्या.  

चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतलेली काव्या केवळ लिलावादरम्यानच नाही तर आयपीएल सामन्यांदरम्यानही स्टेडियममध्ये दिसते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्याने वडील कलनिधी मारन यांच्या व्यवसायात प्रवेश केला. कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे मालक आहेत. या नेटवर्कमध्ये 32 चॅनेल आणि 24 एफएम रेडिओ स्टेशन आहेत.

कलानिधी मारन यांची पत्नी कावेरी मारन देखील सनरायझर्स हैदराबादशी संबंधित आहे. त्या देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यावसायिक महिलांपैकी एक आहे. वडील मालक असूनही काव्या थेट त्यांच्या व्यवसायात सामील झाल्या नाहीत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली.

6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या काव्याला फिरण्याचा आणि संगीत ऐकण्याचा विशेष छंद आहे. याशिवाय त्यांना मीडिया क्षेत्र आणि विमान वाहतूक क्षेत्रातही रस आहे. काव्याने सन टीव्ही नेटवर्कसोबत 2019 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कलानिधी मारन यांनी त्यांच्या मुलीचा संचालक मंडळावर समावेश केला होता. काव्या सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटिंग टीममध्ये सक्रिय सहभागी आहे. 

सन NXT या डिजिटल विभागासाठीही त्या जबाबदार आहे. काव्या सन NXT चे प्रमुख आहे.