कर्णधार Kane Williamson च्या 'त्या' कामगिरीवर मालकीण फिदा!

कर्णधार केन विलियम्सनची कामगिरीही खराब दिसून येतेय. मात्र तरीही केनने टीमच्या मालकीणीचं मनं जिंकलं आहे. 

Updated: Apr 6, 2022, 01:34 PM IST
कर्णधार Kane Williamson च्या 'त्या' कामगिरीवर मालकीण फिदा! title=

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची सुरुवात काही खास झालेली दिसत नाही. हैदराबादचे सिझनमध्ये 2 सामने झाले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान यामध्ये कर्णधार केन विलियम्सनची कामगिरीही खराब दिसून येतेय. मात्र तरीही केनने टीमच्या मालकीणीचं मनं जिंकलं आहे. 

सोमवारी लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला. मात्र या सामन्यात केनने घेतलेल्या एका कॅचममुळे टीमची मालकीण काव्या मारन फारच खूश झालेली दिसली. 

लखनऊ सुपर जाएंट्स फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरली होती. यावेळी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर क्विंटन डिकॉक आऊट झाला. यावेळी क्विंटनचा उत्तम कॅच कर्णधार केन विलियम्सनने पकडला. यावेळी मालकीण काव्या मारनची रिएक्शन पाहण्यासारखी होती.

केन विलियम्सनचा कॅच पाहण्यासाठी क्लिक करा

 

हा सामना पाहण्यासाठी काव्या स्टॅंडमध्ये बसली होती. केनने क्विंटनचा पकडलेला कॅच पाहून काव्या तिला झालेला आनंद लपवू शकली नाही. दरम्यान तिचा हा आनंद कॅमेरामध्ये कैद झाला आहे. कॅमेराची नजर आपल्यावर आहे हे कळताच तोंडावर हात ठेवत काव्याने आपला आनंद लपवण्याचा प्रयत्न केला. 

काव्या मारन हैदराबादच्या प्रत्येक सामन्यात आपल्या टीमचा प्रोत्साहन देण्यासाठी येते. याचमुळे काव्याचा फॅन फोलोविंगही बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.