'रोहित शर्मा खेळाडूंना शिवीगाळ करतो', टीममधील ज्युनिअरचा गौप्यस्फोट

ज्युनिअरकडून लाडका कॅप्टन रोहित शर्माची पोलखोल म्हणाला, 'तो शिवीगाळ करतो पण....'

Updated: Apr 6, 2022, 01:13 PM IST
'रोहित शर्मा खेळाडूंना शिवीगाळ करतो', टीममधील ज्युनिअरचा गौप्यस्फोट title=

मुंबई : टीम इंडियातील खेळाडूंचे जसे मैदानाबाहेर किस्से घडतात त्यापेक्षा जास्त किस्से हे सरावात किंवा सामन्यादरम्यान घडत असतात. धोनीनंतर लाडका कॅप्टन रोहित शर्माबाबत ज्युनिअरने गौप्यस्फोट केला आहे. त्याच्या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली. 

आयपीएलमधील सर्वात महागडा प्लेअर ईशान किशन आहे. त्याने यंदाच्या हंगामात दोन सामने खेळले आहेत. त्याने एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माबाबत एक गौप्यस्फोट केला. त्याने काही किस्सेही शेअर केले. 

'मैदानात रोहित नेहमी डोक्याने खेळतो. तो जे बोलतो तेच घडतं. एकदा मला वाटलं की रोहितने अशी का फिल्डिंग लावली? पण त्याचं उत्तर मला फलंदाज मैदानात आल्यानंतर समजलं. रोहितने जे केलं त्यामुळे चांगला फायदा झाला.' 

'राहुल चाहरने उत्तम कामगिरी केली याचं श्रेय रोहितला जातं. तो खेळाडूवर खूप विश्वास ठेवतो आणि त्याला आत्मविश्वास देतो. रोहित शर्मा सामन्यात शिवीगाळही करतो. मात्र त्यानंतर हे सीरियसली घेऊ नको सामन्यात अशा गोष्टी होत राहतात असंही सांगतो.' अशा काही गोष्टी ईशान किशननं रोहितबद्दल सांगितल्या आहेत. 

ईशान किशननं एक किस्सा सांगितला. ज्यामध्ये तो म्हणाला की एकदा मलाही रोहितने शिवीगाळ केला होता. पण त्याप्रसंगात माझी चूक होती. मैदानात मी बॉल कॅच न देता जमिनीवरून सरकवला. जमिनीवर दवबिंदू होते त्यामुळे बॉल खराब झाला. त्यामुळे रोहितने मला शिवीगाळ गेला असं ईशाननं सांगितलं. 

23 वर्षांच्या ईशान किशनला मुंबईने 15.25 कोटी रुपये देऊन संघात घेतलं आहे. यंदाच्या हंगामातील तो सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याने यंदाच्या हंगामात उत्तम कामगिरी केली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ईशानच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत.