कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यावेळी खूप आनंदी आहे कारण बराच काळ परदेशी टीम्सचे दौरे टाळल्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानात सामने खेळवायला सुरुवात केलीये. न्यूझीलंड टीम मागील दौऱ्यावर एकही सामना न खेळता परतला होता आणि त्यासाठी आता वर्षातून दोनदा न्यूझीलंड पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने या दौऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
पीसीबीच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये केन म्हणाला, “पाकिस्तानमध्ये परत जाणं आणि क्रिकेट खेळणं नक्कीच खूप रोमांचक असेल. त्यांचा क्रिकेटचा गौरवशाली इतिहास आहे. पाकिस्तानमध्ये बरेच चांगले सामने खेळले गेले आहेत आणि मी तो अनुभव घेण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानकडे क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट टीम आहे. त्यामुळे हे काम खूप कठीण जाणार आहे हे आम्हाला चांगलेच माहीतीये. आम्ही हे कठीण आव्हान पेलण्याची वाट पाहत पाहतोय."
तो पुढे म्हणाला, “पाकिस्तानने विश्वचषक क्रिकेटमध्ये बरेच वेगवान गोलंदाज दिलेत आणि त्यांच्याकडे खूप चांगले फलंदाजही आहेत. त्याचा कर्णधार बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे."
आयसीसीने पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार ही टीम वर्षातून दोनदा पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यावर्षी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत न्यूझीलंड कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर एप्रिल-मेमध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी जाणार आहे.
27-31 डिसेंबर - पहिली कसोटी, कराची (ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप)
4-8 जानेवारी – दुसरी कसोटी, मुलतान (ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप)
11 जानेवारी - पहिली वनडे, कराची (ICC सुपर लीग)
13 जानेवारी - दुसरी वनडे, कराची (ICC सुपर लीग)
15 जानेवारी – तिसरा वनडे, कराची (ICC सुपर लीग)
13 एप्रिल - 1 ला T20I, कराची
15 एप्रिल - दुसरी T20I, कराची
तिसरा T20 आंतरराष्ट्रीय 16 एप्रिलपासून कराची
19 एप्रिल – चौथी T20I, कराची
23 एप्रिल - 5वी T20, लाहोर