Jos Buttler: पराभवानंतर जॉस बटलरने जबाबदारी झटकली; BCCI वर फोडलं खापर

Jos Buttler: बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या टीमकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर त्यांच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलंय.

सुरभि जगदीश | Updated: Oct 16, 2023, 12:11 PM IST
Jos Buttler: पराभवानंतर जॉस बटलरने जबाबदारी झटकली; BCCI वर फोडलं खापर title=

Jos Buttler: वर्ल्डकप 2023 मध्ये रविवारी मोठा उलटफेर पहायला मिळाला. रविवारी रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने इंग्लंडच्या टीमचा पराभव काढला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा 69 रन्सने पराभव केला. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या टीमकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर त्यांच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला जॉस बटलर?

अफगाणिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर बटलरने गोलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. बटलर म्हणाला, “टॉस जिंकून इतके रन्स देणं निराशाजनक आहे. अफगाणिस्तानला विजयाचं श्रेय देतो, त्यांनी आज आमच्यावर मात केली." 

अफगाणिस्तानकडे काही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आम्ही जितकी अपेक्षा केली होती तितकं दव पडलं नाही. बॉल थोडा थांबत होता. त्यांनी चांगला खेळ केला, मात्र आम्हाला तितका चांगला खेळ करता आला नाही, असंही बटलर म्हणाला. एकंदरीत पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडत जोस बटलरने बीसीसीआयकडे इशारा केल्याचं दिसून येतंय. यापूर्वीही बटलरने भारताच्या पीचवर टीका केली होती.

या पराभवानंतर जोस बटलर देखील खूप निराश दिसत होता. तो पुढे म्हणाला, 'या पराभवाने तुम्हाला ( चाहत्यांना ) दु:ख होईल. या टीममध्ये बरेच चांगले खेळाडू आहेत, आम्हाला खूप लवचिकता दाखवण्याची आणि मजबूत कमबॅक करण्याची गरज आहे. दबावातही चांगली कामगिरी करू शकतील अशा खेळाडूंची आम्हाला गरज आहे. 

अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा पराभव

या सामन्यात टॉस जिंकून जॉस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडला महागात पडला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावून 284 रन्स केले. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक 80 रन्सची खेळी खेळली. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ 215 रन्सवरच आटोपला. हॅरी ब्रूक वगळता एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. ब्रूकने 61 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी केली.

Jos Buttler अफगाणिस्ताविरूद्ध फेल

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची कमान जॉस बटलरच्या हाती आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात बटलरला मोठी खेळी साकारता आली नाही. आहे. आतापर्यंत इंग्लंडने तीन सामने खेळले असून त्यात बटलरच्या बॅटने एकाही सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बटलरने 43 रन्स केले, तर बांगलादेशविरुद्ध बटलरने 20 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 9 रन्स करता आले.