मुंबई : श्रीलंकेच्या विरोधात वनडे सीरीजमध्ये भारताने अनेक रेकॉर्ड बनवले. यावडेमध्ये जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या. बुमराहची यॉर्कर आणि स्लो बॉल लंकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलं.
बुमराहने सिरीजमध्ये 11.26 च्या रनरेटने 169 रन दिले आणि 15 विकेट घेतले. तिसऱ्या वनडेमध्ये त्याने 27 रन दिले होते आणि 5 विकेट घेतले होते. ही त्याची वनडेमधली सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती.
बुमराहने त्याच्या या कामगिरीने श्रीलंकेच्या विरोधात कोणत्याही सीरीजमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाजचा खिताब आपल्या नावे केला आहे. बुमराहने इंग्लंडच्या क्रिस वोक्सला मागे टाकलं आहे. वोक्सच्या नावे श्रीलंकेच्या विरोधात सीरीजमध्ये 14 विकेट घेतले होते.
कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या सिरीजच्या शेवटच्या सामन्यामध्ये बुमराहने 45 रन दिले आणि २ विकेट घेतले. बुमराहने श्रीलंकेचा स्पिनर अजंता मेंडिसला देखील मागे टाकलं आहे. मेंडिसच्या नावावर 13 विकेट होते. मेंडिसने 2008 मध्ये भारताच्या विरोधात ५ सामन्यांच्या सिरीजमध्ये १३ विकेट घेतले होते.