जयपूर : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या एका नो बॉलचा भारताला चांगलाच फटका बसला. या नो बॉलमुळे जसप्रीत बुमराहवर टीकेची झोड उठलेली असताना जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी या नो बॉलचा समाज प्रबोधनासाठी वापर केला आहे.
जयपूर ट्रॅफिक पोलिसांची ही जाहिरात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. लाईन क्रॉस करू नका, ते महागात पडू शकतं अशा आशयाची जाहिरात जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी केली आहे.
लखनऊ सेंट्रल झोनचे आयजी ए सतीश गणेश यांनीही ट्विटर अकाऊंटवरून बुमराहच्या नो बॉल चा फोटो शेअर केला आहे. कधी कधी लाईन क्रॉस करणं महागात पडू शकतं. ट्रॅफिक क्रॉसिंगवर झेब्रा लाईन पार करू नका, असं ट्विट सतीश यांनी केलं आहे.
बुमराहच्या या नो बॉलवर पाकिस्तानचा बॅट्समन फखर जमान आऊट झाला होता. त्यावेळी तीन रनवर बॅटिंग करत असणाऱ्या जमाननं ११४ रन्सची शानदार खेळी केली. फकर जमान ३४ व्या ओव्हरला आऊट झाला पण तेव्हापर्यंत मॅचचं चित्र पूर्णपणे पालटून गेलं होतं.