रोहित-गिलने इतकं फोडलं की त्याच्या नावाचा रेकॉर्डच झाला, खराब कामगिरीत ठरला जगातील पहिला गोलंदाज

रोहित आणि शुभमनच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या नावावर एक खराब रेकॉर्ड झाला आहे. इतकंच नाहीतर तो खेळाडू जगातील पहिला अशी वाईट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. 

Updated: Jan 24, 2023, 09:15 PM IST
रोहित-गिलने इतकं फोडलं की त्याच्या नावाचा रेकॉर्डच झाला, खराब कामगिरीत ठरला जगातील पहिला गोलंदाज title=

Ind vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामना इंंदूरच्या होळकर मैदानावर होत आहे. या सामन्यामध्ये भारताने 385 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने 300 धावांचा टप्पा पार केला. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना खरपूस समाचार घेतला. मात्र दोघांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या नावावर एक खराब रेकॉर्ड झाला आहे. इतकंच नाहीतर तो खेळाडू जगातील पहिला अशी वाईट कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. (Jacob Duffy became the worlds first bowler embarrassing record)

वनडे मध्ये तीन विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्य 100 धावा देणारा तो पहिला जगातील असा खेळाडू ठरला आहे. जैकब डफी असं न्यूझीलंडच्या गोलंदाजाचं नाव आहे. याआधी हा खराब रेकॉर्ड बांगलादेशचा शैफुल इस्लाम अवांछितच्या नावावर होता. त्याने 2010 साली पाकिस्तानविरूद्धच्या 10 ओव्हरमध्ये 95 धावा घेत 3 विकेट्स घेतल्या होत्या. 

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. 1996 साली पाकिस्तानविरूद्ध 94 धावा, चौथ्या स्थानी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा न्यूझीलंडविरुद्ध 93 धावा तर पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या झ्ये रिचर्डसन यांनी इंग्लंडविरुद्ध 92 धावा देत 3 गडी बाद केले होते. आजच्या सामन्यात डफीने विराट कोहली 36, सुर्यकुमार यादव 14 आणि हार्दिक पंड्याला 54 धावांवर बाद केलं. या त्रिमुर्तींच्या विकेटसाठी मात्र डफीला 100 धावा मोजाव्या लागल्या. 

दरम्यान, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या न्यूझीलंड संघाला धावांचं लक्ष्य पुर्ण करता आलं नाही. कुलदीप यादवने 3 तर शार्दुल ठाकुरच्या 3 बळींच्या जोरावर भारताल हा सामना खिशात घालणं शक्य झालं. डेव्हिड कॉनवेच्या वादळी शतकामुळे न्यूझीलंडच्या पारड्यात सामना झुकला होता. मात्र काश्मीर एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकने त्याला माघारी पाठवत सामना पुन्हा भारताच्या बाजूने खेचला. भारताने न्यझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे.