IND vs NZ 3rd ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1'

ICC ODI Team Rankings: किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ 3rd ODI) पराभव केला.

Updated: Jan 24, 2023, 09:18 PM IST
IND vs NZ 3rd ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1' title=
IND vs NZ 3rd ODI

Ind Vs Nz : आगामी वनडे वर्ल्ड कपच्या (ICC ODI World Cup) पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान (ICC ODI Rankings) प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सामना 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे. (IND vs NZ 3rd ODI india beat new new zealand and get no 1 position in odi ranking)

भारताने दिलेल्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 295 धावांवर ठेपाळला. या सामन्यात Devon Conway ने वादळी खेळी केली.  त्याने फक्त 100 बॉलमध्ये 138 धावा केल्या. कॅन्वेने या सामन्यात एकाकी झुंज दिली. Henry Nicholls ने 42 धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मैदानात टिकता आलं नाही. Mitchell Santner ने अखेरीस 34 धावा केल्या खऱ्या पण त्याचा फायदा झाला नाही. 

आणखी वाचा - हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारताने 385 धावांचा डोंगर उभारला. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी खास राहिली. कॅप्टन रोहित शर्माने वादळी खेळी करत 101 धावा केल्या आणि शतकांचा दुष्काळ संपवला. तर शुभमन गिलने देखील 112 धावांची खेळी केली आणि पुन्हा एकदा वर्ल्ड कप संघावर दावेदारी ठोकली आहे. तर हार्दिक पांड्याने देखील अखेरच्या षटकात 54 धावा करत संघाला 400 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तब्बल 13 वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 5-0 असा क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर आता रोहित शर्माने गंभीरच्या रेकॉर्डची बरोबरी केलीये. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया तयार झालीये, अशी चर्चा होताना दिसत आहे.