दिवाळीचा फोटो शेयर करणं इशांत शर्माला महागात

टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: Oct 29, 2019, 09:12 PM IST
दिवाळीचा फोटो शेयर करणं इशांत शर्माला महागात title=

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेयर केले आहेत. पण फास्ट बॉलर इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेयर करुन चांगलाच गोत्यात आला.

सोमवारी इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेयर केला. इशांत शर्माने हा फोटो टाकल्यानंतर लगेचच त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. इशांत शर्माने टाकलेल्या या फोटोमध्ये त्याच्या घरात आसाराम बापूचा फोटो दिसत आहे.

आसाराम बापू हा सध्या बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूरच्या जेलमध्ये आहे. हा फोटो शेयर केल्यामुळे इशांत शर्माला ट्रोल करण्यात आलं. अखेर इशांत शर्माने हा फोटो डिलीट केला. फोटो डिलीट केल्यानंतर त्याने हाच फोटो क्रॉप करून पुन्हा एकदा शेयर केला. इशांत शर्माचं कुटुंब आसाराम बापूचं भक्त होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wishing everyone a very Happy and a safe Diwali from us to you!

A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29) on

आसाराम बापूला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. जोधपूरच्या जेलमध्ये आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. अनेलवेळा जामिनासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने त्याचे अर्ज फेटाळून लावले आहेत.