इशानची १७ बॉलमध्ये फिफ्टी, बसला 'या' दिग्गजांच्या रांगेत

 फास्टेस्ट फिफ्टीमध्ये तो आता क्रिस गेल, एडम गिलक्रिस्ट, क्रिस मॉरिस, सुनील नरेन आणि किरोन पोलार्डच्या रांगेत जाऊन बसला. 

Updated: May 10, 2018, 12:07 PM IST
इशानची १७ बॉलमध्ये फिफ्टी, बसला 'या' दिग्गजांच्या रांगेत title=
मुंबई : इशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईची टीम आयपीएल सीझन ११ च्या टॉप ४ मध्ये पोहोचली आहे. काल कोलकाताच्या टीमसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने २० ओव्हरमध्ये २१० रन्स बनविले. इशान किशन या मॅचचा हिरो ठरला. त्याने २१ बॉलमध्ये ६२ रन्सची तूफानी खेळी करत आपल्या टीमच जिंकण सुनिश्चित केलं.  अवघ्या १७ बॉलमध्ये त्याने अर्धशतक केलं. फास्टेस्ट फिफ्टीमध्ये तो आता क्रिस गेल, एडम गिलक्रिस्ट, क्रिस मॉरिस, सुनील नरेन आणि किरोन पोलार्डच्या रांगेत जाऊन बसला. आयपीएलचा सर्वात फास्ट फिफ्टीचा रेकॉर्ड पंजाबच्या के.एल राहुलच्या नावे आहे.  २१० रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला कोलकात्याचा संघ १८ व्या ओव्हरमध्येच गारद झाला. कोलकात्याचा संघ १८.१ ओव्हरमध्ये १०८ रन्सच बनवू शकला. इशानने आपल्या विस्फोटक खेळीबद्दल सांगितले आहे. 

नैसर्गिक खेळ केला 

कॅप्टन रोहित शर्मासोबत माझ बोलण झाल. त्याने मला माझा स्वाभाविक खेळ करायला सांगितला.त्यानंतर मी बॉलवर नजर ठेवून माझा नैसर्गिक खेळ केल्याचे त्याने सांगितले. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवायला लागतो. मी कोणत्याही नंबरवर खेळ करण्यास तयार असल्याचेही तो म्हणाला. ईशान काल जेव्हा बॅटींग करायला मैदानात आला तेव्हा मुंबईचा संघ ८.६ ओव्हरमध्ये २ विकेट आणि ६२ रन्स असा होता. त्यानंतर इशानने २१ बॉलमध्ये ६ सिक्स आणि ५ फोरच्या मदतीने विस्फोटक खेळी केली. त्यानंतर कोलकात्याच्या संघाकडे जिंकण्यासारख काही राहिलच नव्हत.  

आईपीएलच्या १० सर्वात जलद फिफ्टी

१४ बॉल केएल राहुल (किंग्स इलेवन वि. दिल्ली डेयरडेविल्स) २०१८
१५ बॉल सुनील नरेन (केकेआर वि. आरसीबी) २०१७
१५ बॉल यूसुफ पठान (केकेआर वि. सनराइजर्स हैदराबाद) २०१४
१६ बॉल सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेवन) २०१४
१७ बॉल क्रिस गेल (आरसीबी वि. पुणे वॉरियर्स) २०१३
१७बॉल एडम गिलक्रिस्ट (डेक्कन चार्जर्स वि. दिल्ली डेयरडेविल्स) २००९
१७ बॉल क्रिस मॉरिस (दिल्ली डेयरडेविल्स वि. गुजरात लॉयंस) २०१६
१७ बॉल सुनील नरेन (केकेआर वि. आरसीबी) २०१८
१७ बॉल किरोन पोलार्ड (मुंबई इंडियंस वि. केकेआर) २०१६
१७बॉल ईशान किशन (मुंबई इंडियंस वि. केकेआर) २०१८